अजित पवार सक्षम नेते, लवकरात लवकर ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत; राष्ट्रवादीच्या आमदाराचा पुन्हा दावा
Junnar MLA Atul Benke on Ajit Pawar Maharashtra Chief Ministership : अजित पवार, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद अन् चर्चा; सामान्य कार्यकर्त्यापासून ते अजित पवार यांच्या आईपर्यंत... समर्थकांना वाटतं, दादाच मुख्यमंत्री व्हावेत! राजकीय वर्तुळात चर्चाच चर्चा, वाचा सविस्तर..
सुनिल थिगळे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 05 नोव्हेंबर 2023 : अजित पवार… महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असं नावं… जे आतापर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र त्यांनी राज्याच्या प्रमुखपदी बसावं. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं, अशी त्यांच्या समर्थकांची मनोमन इच्छा आहे. ही भावना त्यांचे समर्थक वारंवार बोलून दाखवत असतात. आताही राष्ट्रवादीच्या आमदाराने असंच वव्तव्य केलं आहे. अजित पवार हे राज्याचे सक्षम मुख्यमंत्री होऊ शकतात. लवकरात लवकर या राज्याचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचं हे मत आहे, असं आमदार अतुल बेनके यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या मातोश्री म्हणाल्या…
अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं म्हटलं. माझ्या डोळ्या देखतच अजितदादाने राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, ही माझी इच्छा आहे, असं त्या म्हणाल्या. आशाताई पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वारंवार म्हणत असतात. आता आमदार अतुल बेनके यांनीही असंच वक्तव्य केलं आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीवर म्हणाले…
ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यावरही अतुल बेनके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायणगाव ही पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. तमाशा पंढरीपासून हे गाव अध्यमकतेच्या पातळीवर आणि कलेच्या पातळीवर आणि शिक्षणाच्या पातळीवर गावाचे मोठं गाव आहे. नारायणगाव शहराचा विकास होता आहे. तर मात्र ग्रामपंचायत वाढत चालली आहे. तशी आवाहने वाढत आहे. निवडणुकीत खूप खालच्या पातळीवर प्रचार झाला नाही, असं अतुल बेनके म्हणाले.
निवडणुकीत सहभाग का नाही?
मी आणि अमोल कोल्हे यांनी या निवडणुकीत प्रत्यक्ष येणं टाळला आहे. सगळ्याचं नेत्यांनी येणं टाळलं आहे. खालच्या पातळीवर निवडणूक व्हावी, म्हणून दोन्ही बाजूकडून हा निर्णय घेण्यात आला. खासदार अमोल कोल्हे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुरस्कृत पॅनेलला ज्या ज्या अडचणी आहेत. त्यासाठी जी मदत करता येईल त्या केलेल्या आहे. जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी हा एक संघ आहे. भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकसंघ राहतील ही अपेक्षा आहे. तसं होईलही आणि तेच भविष्यात पक्षासाठी हिताचं राहील, असं अतुल बेनके म्हणाले.