“आमच्या नेत्यांवर टीका कराल,तर जशास तसे उत्तर मिळेल”; भाजप नेत्यानं उद्धव ठाकरे थेट इशाराच दिला
जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका कराल तर जनताच त्यांना योग्य धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच भाजपाच्या नेत्यांवर टीका कराल, तर त्याला जशास तसे उत्तर मिळेल असं त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे : एक अत्यंत फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार आणि लाळघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतो आहे अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आला आहे. उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यामुळे अनेक भाजप नेत्यानी आता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केला आहे.
खासदार अनिल बोंडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना आपण शब्द जपून वापरावेत असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि फडणवीस असा जोरदार वाद आता रंगला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सत्ता हातातून गेल्यापासून उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. त्ंयांच्यामुळेच ते आता संजय राऊत यांची भाषा बोलू लागले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.
मात्र उद्धव ठाकरे यांना आपल्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत. आपण शब्द जपून वापरावेत, असा सल्ला्ही उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच, आमच्या नेत्यांवर टीका कराल, तर जशास तसे उत्तर मिळेल, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांना इशारा दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सध्या राज्याच्या राजकारणात टीका करण्यासाठी काही नेते अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. उद्धव ठाकरे हे संयमी नेते होते.
मात्र, सत्ता हातातून गेल्यापासून ते हताश झाले आहेत. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरे संजय राऊतांची भाषा बोलत आहेत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला आहे.
जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका कराल तर जनताच त्यांना योग्य धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच भाजपाच्या नेत्यांवर टीका कराल, तर त्याला जशास तसे उत्तर मिळेल असं त्यांनी यावेळी सांगितले.