Ravindra Dhangekar : गंभीर आजार नसताना ललित पाटील रुग्णालयात कसा? आमदार रवींद्र धंगेकर यांचं पोलीस आयुक्तांना पत्र

Congress MLA Ravindra Dhangekar on Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. कुठलाही गंभीर आजार नसताना इतक्या दिवसापासून ललित पाटील रुग्णालयात उपचार कसे घेत होता? असा सवाल काँग्रेस आमदार रविद्र धंगेकर यांनी उपस्थित केलाय.

Ravindra Dhangekar : गंभीर आजार नसताना ललित पाटील रुग्णालयात कसा? आमदार रवींद्र धंगेकर यांचं पोलीस आयुक्तांना पत्र
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 2:11 PM

पुणे | 11 ऑक्टोबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील केस प्रकरणी विरोधक आता आक्रमक झाले आहेत. पुण्याताली कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. उपचाराच्या नावाखाली ड्र्ग्स माफिया ललित पाटीलला मदत करणाऱ्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांना सहआरोपी करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी पत्राद्वारे पुणे पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे. या सगळ्या प्रकरणी ससून रुग्णालय देखील जबाबदार असल्याचा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना धंगेकर यांनी काही व्हीडिओ क्लिपचा उल्लेख त्यांनी केला आहे. तसंच हे व्हीडिओ आपण लवकरच सर्वांसमोर आणणार असल्याचं रविंद्र धंगेकर म्हणालेत.

कुठलाही गंभीर आजार नसताना इतक्या दिवसापासून ललित पाटील रुग्णालयात उपचार कसे घेत होता?, असा सवाल आमदार रवींद्र धंगेकर विचारत आहेत. ससून रुग्णालयातील काही डॉक्टरांनी ललित पाटील याचा मुक्काम ससून रुग्णालयात वाढवण्यासाठी मदत केल्याचा देखील आरोप धंगेकर यांनी केलाय. त्यांनी तसं पत्र पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय. ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्या सह ६ डॉक्टरांची तक्रार त्यांनी यात दाखल केलीय. ससून रुग्णालयातील डॉक्टरांना सह आरोपी करुन ड्रग्ज प्रकरणात गुन्हा दाखल करा, अशी मागणी धंगेकर यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

ललित ससूनमधून ज्या हॉटेलमध्ये पोहचला त्याच हॉटेलमध्ये अवघ्या एका तासात पोलीस कर्मचारी देखील कसा पोहचला? ज्या पोलीस कर्मचारी काळे यांच्या हाताला झटका देऊन ललित पळाला, असं सांगितलं गेलं. तेच काळे अवघ्या एका तासात हॉटेलमध्ये पोहचले. हॉटेलमधील cctv समोर आल्याने पोलीस कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत.

त्याच पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देत ललित पाटील पळून गेल्याचा दावा करण्यात आला होता. संध्याकाळी 7:47 ला ललित हॉटेलमध्ये पोहचताच अवघ्या एका तासात पोलीस त्याच हॉटेलमध्ये कसे पोहचले? ससूनमधील पोलिसांना मॅनेज करून ललित पाटील अनेकदा त्याच हॉटेलमध्ये जात असल्याची सूत्रांकडून माहिती आहे. पोलीस कर्मचाऱ्याचं Exclusive CCTV फुटेज समोर आलंय. त्यामुळं ललित पाटील पळाला कि पळवला गेला?, असा सवाल उपस्थित होत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.