पुणे | 20 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे. पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले वाड्यात राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याजागी कंत्राटी भरती करण्याचे धोरण सरकारने अवलंबलं आहे. जी काही सरकारी भरती होत आहे, त्यातही प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. परीक्षा फीच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना लुबाडून आपली तिजोरी भरत आहे, असं म्हणत राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन केलं जात आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषणही करण्यात येत आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आमदार, नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थितीत आहेत.
आज आम्ही सर्व युवा, विदयार्थी हे आंदोलन आराजकीरीत्या करत आहोत. हे उपोषण प्राथमिक स्तरावर आहे. आंदोलनाचं हे ठिकाणही मुलांनी निवडलं आहे. हे ठिकाण प्रेरणा देणारं आहे. इथंच शिक्षणाच्या संदेश दिला गेला. सामान्य लोकांच्या बाजूने त्यांनी लढा उभारला. तिथंच आम्ही हे आंदोलन करत आहोत. उपोषण करताना आमच्या तीन मागण्या आहेत. ही सगळी मुलं सिरीयस आहेत. घरात गणपती असताना सर्व आले आहेत. तरी कंत्राटी भरतीच्या विरोधात आमचं आंदोलनं सुरु आहे, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
25 हजार विद्यार्थ्यांना नोकरी दिली जाईल. यात कंत्राटदार मोठे होणार आहेत. दुसरा मुद्दा राहिला फी वाढीचा आहे. वसूल केलेली फी परत द्या. तलाठी भरतीचे पैसे परत मिळावेत. तिसरा मुद्दा म्हणजे एका भरतीसाठी पैसे गोळा केले गेले पेपर फोडण्यात आले. राजस्थान सरकारसारखा कायदा राज्य सरकारने आणला पाहिजे. जर परीक्षा घोटाळा झाला असेल तर समिती स्थापून याची चौकशी व्हावी, असंही रोहितव पवारांनी यावेळी म्हटलं.
देशात महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास अभिवादन करून विद्यार्थी व युवांच्या हितासाठी #लाक्षणिक_उपोषणास सुरूवात!
दत्तक तत्वाच्या नावाखाली शाळांचंही खाजगीकरण करण्याचा घाट घालणाऱ्या सरकारला सद्बुद्धी… pic.twitter.com/KJVTzyJibb— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 20, 2023
रोहित पवार यांनी शिंदे सरकारच्या कारभारावर टीकास्त्र डागलंय. पदभरतीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. युवकांच्या बाबतीत यांना फक्त अतिरिक्त खर्च जाणवतोय का? शाळा देखील चालवायला देत आहेत. सगळा ढिसाळ कारभार सुरु आहे, असं रोहित पवार म्हणाले.