Rohit Pawar : आरोग्य विभागात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरूये; रोहित पवार यांची शिंदे सरकारवर घणाघाती टीका

Rohit Pawar on Maharashtra Health Minister Tanaji Sawant : हाफकीन माणूस आहे की, कंपनी हे सुद्धा आरोग्यमंत्र्यांना माहित नाही!; रोहित पवार यांचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीकास्त्र. शिंदे सरकारवर निशाणा. युवा संघर्ष यात्रेवरही भाष्य. रोहित पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...

Rohit Pawar : आरोग्य विभागात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरूये; रोहित पवार यांची शिंदे सरकारवर घणाघाती टीका
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 2:59 PM

अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 21 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज्यातल्या आरोग्य विभागात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. राज्याला आरोग्य संचालक नाहीत. निधीचे पैसे गरिबाला दिले जात नाहीत. आपल्या आरोग्य मंत्र्यांना हाफकीन माणूस आहे की कंपनी हे सुद्धा माहिती नाही! आरोग्यमंत्र्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. लोकांना औषधं मिळत नाहीत. कर्मचारी भरती केली जात नाहीये, असं म्हणत रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्ष फोडला गेला. आमचं कटुंब आणि राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनाही फोडलं गेलं. या सगळ्या नेत्यांचा वापर लोकसभेसाठी केला जाईल आणि नंतर त्यांना बाहेर काढतील. सगळे मंत्री हे नावापुरते आहेत. पण सगळा कारभार मात्र देवेंद्र फडणवीस सांभाळतात. पुढच्या निवडणुकीत सगळ्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढवायला सांगतील, असंही रोहित पवार म्हणालेत.

भाजपकडून करण्यात येणारी आंदोलनं म्हणजे ही सगळी नाटक सुरू आहेत. यांना फक्त नाटक करता येतात. यांचे कार्यकर्ते तमाशा करत आहेत. त्यांना काहीच माहिती नाही. हे सगळे tv वर येऊन खोटं बोलत आहेत, असं म्हणत रोहित पवार यांनी टीका केली आहे.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातमध्ये 1 लाख कोटींचं ड्रग्स पकडले गेलं. मग वर्षभरात किती कोटींचा व्यवहार होत असेल, याचा विचार करा. ललित पाटील अॅडमिट आहे. तो ससूनमध्ये बसून ड्रग्स रॅकेट चालवत होता. डीनला याची माहिती देखील नाही? याचा अर्थ हा ठाकूर देखील यात सहभागी आहे. कुणा मंत्र्यांचा डीनला फोन आल्याने ललितला तिथं 9 महिने ठेवण्यात आल, याचा खुलासा झाला पाहिजे. युवा संहर्ष यात्रेत आम्ही ड्रग्सचा मुद्दा देखील घेतला आहे. त्यावरही आम्ही आवाज उठवणार आहोत, असं रोहित पवार म्हणालेत.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असणाऱ्या सुनावणीवरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने जर संविधान मनात ठेवून निर्णय घेतला तर पक्षाचं चिन्ह शरद पवारसाहेंबानाच मिळेल, असं रोहित पवार म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.