पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कार ट्रकला मागून धडकली !

कोकणातून पश्चिम महाराष्ट्र मार्गे दोन कुटुंब मुंबईला चालले होते. मात्र पुणे-मुंबई महामार्गावरुन जात असतानाच काळाने घाला घातला. मुंबई पोहचण्याआधीच कुटुंबासोबत जे घडले ते दुर्दैवी.

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कार ट्रकला मागून धडकली !
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 9:19 AM

मावळ, पुणे / रणजित जाधव : पुणे-मुंबई महामार्गावर अपघाताचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. कोकणातील दोन कुटुंब व्हॅगर कारने पुणे मार्गे मुंबईला येत होते. पण पुणे-मुंबई महामार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. भरधाव मारुती कारने ट्रकला मागून धडक दिली. या धडकेत कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. कारमधील दोघे जण जागीच ठार झाले, तर दोघे जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सोमाटणे फाट्यावरील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी महामार्ग पोलीस, आयआरबी कर्मचारी, महाराष्ट सुरक्षा बल आणि स्थानिक राणी अंबुलेन्स सेवा तात्काळ हजर झाली. या अपघातामुळे काही वेळ पुणे मुंबई लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

कोकणातून पुणे मार्गे मुंबईला येत होते

जय सावंत आणि विकास सावंत अशी मयत दोघांची नावे आहेत. अश्विनी राणे आणि आर्या सावंत अशी जखमींची नावे आहेत. सावंत-राणे परिवार मूळ कणकवली सिंधुदुर्ग येथील आहेत. कोकणातून कोल्हापूरमार्गे ते मुंबईतील मुलुंड येथे येत होते. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवर मळवली हद्दीत त्यांची कार ट्रकला धडकली.

कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

धडक इतकी जोरात होती की, कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी ही दोन्ही वाहने एकाच लेनवर होती. मालवाहू ट्रकच्या मगोमाग कार चालली होती. पण कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समोरील ट्रकला धडकली.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.