पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणामधून पुन्हा सोडलं पाणी, पाटबंधारे खात्याकडून महत्त्वाचं आवाहन

Pune News : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून खडकवासला धरणामधून परत एकदा पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व नदीपात्राजवळील पुणेकरांनी काळजी घ्यायला हवी.

पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणामधून पुन्हा सोडलं पाणी, पाटबंधारे खात्याकडून महत्त्वाचं आवाहन
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 8:40 PM

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक धरणांमधून नदीपात्रात सोडण्यात आलं. पुण्यामध्ये तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर वारजे भागातील एका गोठ्यातील जनावरेही दगावली होतीत. खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदापात्रातून पाणी बाहेर निघाले. मानवी वस्तीमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच आज म्हणजेच रविवारी खडकवासला धरणामधून रात्री आठ वाजता पाणी सोडण्यात आलं आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 7 हजार 704 क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य किंवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत, असं आवाहन मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाकडून करण्यात आलं आहे.

नदी पात्रातील निषिद्ध क्षेत्रात उतरू नये, पाटबंधारे विभगाच्या नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील 48 तासात मुठा नदी मध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील धरणं 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.

पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पाऊस झाला होता. यामध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नागरिकांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळालं होतं.

  • खडकवासला 80 टक्के
  • पानशेत 94 टक्के
  • टेमघर धरण ७८ टक्के
  • पवना धरण ८४ टक्के
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.