Tarkarli boat accident : तारकर्ली बोट दुर्घटनेत पुण्यातल्या अस्थिरोगतज्ज्ञाचा दुर्दैवी मृत्यू, आमदाराचा भाचाही गेला

आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे हे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने आपल्या कुटुंबीयांसह मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते. तारकर्ली बीचवर 20 जणांना घेऊन बोट स्कूबा डायव्हिंगसाठी समुद्रात गेली होती. त्यानंतर स्कूबा डायव्हिंगवरून परतत असताना हा घात झाला.

Tarkarli boat accident : तारकर्ली बोट दुर्घटनेत पुण्यातल्या अस्थिरोगतज्ज्ञाचा दुर्दैवी मृत्यू, आमदाराचा भाचाही गेला
तारकर्ली बोट दुर्घटनेत डॉ. स्वप्निल पिसे यांचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 11:02 AM

जुन्नर, पुणे : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे (Orthopedic surgeon dr. Swapnil Pise) यांचा समुद्रात बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर ही दुर्घटना घडली आहे. यामुळे आळेफाटा परिसरात शोककळा पसरली आहे. सिंधुदुर्ग मालवण (Malvan) तारकर्ली समुद्रात स्कुबा बोट बुडून दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यामधे जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मारुती पिसे (वय 45) यांचाही समुद्रातील पाण्यात बुडून (Drowning) मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी 24 रोजी मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर घडली. डॉ. पिसे कुटुंबासह पर्यटनाला गेले होते. शिवसेना आमदार नितिन देशमुख यांचा भाचा आकाश देशमुख याचादेखील यात मृत्यू झाला आहे.

समुद्रातून बाहेर काढेपर्यंत माझा मृत्यू

आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे हे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने आपल्या कुटुंबीयांसह मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते. तारकर्ली बीचवर 20 जणांना घेऊन बोट स्कूबा डायव्हिंगसाठी समुद्रात गेली होती. त्यानंतर स्कूबा डायव्हिंगवरून परतत असताना हा घात झाला. ही बोट समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक उलटली. बोट उलटल्यानंतर पर्यटकांना वाचावण्यासाठी मदतकार्य सुरू झाले. या सर्वांना समुद्रातून बाहेर काढेपर्यंत डॉ. स्वप्नील पिसे यांचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

बोट बुडाल्यानंतर उडाली धावपळ

बोटीतील सर्व पर्यटक पुण्यातील

बोटीतील सर्व पर्यटक हे पुणे आणि मुंबईतील असल्याचे समजते. शांत, संयमी आणि कार्यतत्पर आणि मदतीसाठी कधीही धावून येणाऱ्या डॉक्टरांचा बुडून मृत्यू झाल्याने अनेक जण हळहळल व्यक्त करत आहे आहेत. या दुर्घटनेत बाळापूर मतदार संघातील शिवसेना आमदार नितिन देशमुख यांचा भाचा आकाश देशमुख याचादेखील मृत्यू झाला आहे. दरम्यान, उन्हाळ्याची सुट्टी असल्याकारणाने मोठ्या संख्येने पर्यटक हे मालवणमध्ये फिरायला येत असतात. समुद्री खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या तारकर्लीत अनेक पर्यटक हे स्कूबा डायव्हिंगसाठी येतात. स्कूबा डायव्हिंगचे प्रमुख आकर्षण असलेल्या मालवणला गेल्या काही काळापासून तारकर्लीत पहिली पसंती मिळत आहे. मात्र तारकर्लीत घडलेल्या घटनेने यासर्वांना गालबोट लागले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.