समलैंगिक संबंधातून क्षुल्लक वाद, पुण्यात मित्राने मित्राला संपवलं
पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. (Pune PhD Student Murder Case)
पुणे : पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या तरुणाच्या खूनाचे गूढ उकलण्यात चतुःशृंगी पोलिसांना यश आलं आहे. समलैंगिक संबंधातून हा खून झाल्याचे उघडकीस झाले आहे. या प्रकरणी रविराज क्षीरसागर (35) याला पोलिसांनी अटक केली आहे. (Pune PhD Student Murder Case Solve)
नेमकं प्रकरण काय?
पुण्यात पीएचडी करत असलेल्या एका विद्यार्थ्याची काल हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन हत्या केल्यानंतर दगडाने ठेचून त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला होता. सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडित असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या हत्येमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती.
सुदर्शन हा पुण्यातील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे पीएचडी करत होता. सुतारवाडी भागातील शिवनगर परिसरात सुदर्शन पंडित राहत होता. तो मूळ जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जानेफळचा (पंडित) रहिवासी होता. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. त्याचा मृतदेह सुस येथील खिंडीत टाकून देण्यात आला. (Pune PhD Student Murder Case Solve)
सुदर्शनच्या हत्येबाबत त्याचा चुलत भाऊ संदीप पंडित यांनी तक्रार दिली. या प्रकरणी पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या तरुणाच्या खूनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.
समलैंगिक संबंधातून हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन हा मूळचा जालना जिल्ह्यातील असून सुतारवाडी भागात पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. गेल्या दीड वर्षांपासून तो पुण्यातील एनसीएलमध्ये रसायनशास्त्र विषयात पीएचडी करत होता. डेटिंग साईटवर सुदर्शन आणि रविराजची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
मात्र, काही कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर ते दोघे सुस खिंडीत गेल्यानंतर रविराजने सुदर्शनचा गळा चिरला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला. याप्रकरणी पोलिसांनी रविराज क्षीरसागर याला अटक केली आहे.
भिवंडीतील आदिवासी शिधापत्रिकाधारक तीन महिने धान्यापासून वंचित#bhiwanditribal #rationcardhttps://t.co/PUKqPmbYGN
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
(Pune PhD Student Murder Case Solve)
संबंधित बातम्या :
पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याची हत्या, धारदार शस्त्राने हल्ला करुन दगडाने ठेचलं
दोन लहान मुलं, तरीही पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, पतीचं क्रूर कृत्य, घरदार उद्ध्वस्त