Pune crime : बनावट नावे वापरून करत होते व्यापाऱ्यांची फसवणूक, वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) बनावट नावे वापरून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाकड (Wakad) पोलिसांनी (Police) अटक केली आहे. एकूण 16 लाख 18 हजार 507 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. वाकड पोलीस अधिक तपास सुरू आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) बनावट नावे वापरून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाकड (Wakad) पोलिसांनी (Police) अटक केली आहे. दापोडी इथले व्यापारी व्हिक्टर जॉन पीटर यांच्या दुकानातून परराज्यातील व्यापारी असल्याचे सांगून सुरुवातीला विश्वास संपादित केला. त्यानंतर काही काळाने 11 लाखांहून अधिक किंमतीचे मॅट्रेस पिलो कव्हर असे साहित्य घेऊन गेल्याची घटना घडली आहे. व्हिक्टर जॉन पीटर (रा. दापोडी ) यांचे ताथवडे येथे प्राइम सेल्स कॉर्पोरेशन नावाचे दुकान असून ते स्लिपशुअर कंपनीचे वितरक आहेत. ते बेडशीट व इतर वस्तू विक्री करतात. दरम्यान, यासंबंधी व्हिक्टर यांनी वाकड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. राजाराम भाटी या व्यापाऱ्याची ही 8 लाख रुपयांना अशीच फसवणूक झाली आहे. वाकड पोलिसांनी त्याचा तपास करत 4 जणांना अटक केली आहे. तर त्यांच्याकडून 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परराज्यातून अटक
या आरोपींनी गुन्हा करण्यासाठी बनावट नाव वापरल्याचे तपासात समोर आले. दीपक व अशोककुमार यांना गुजरात येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्यांनी झाकीर हुसैन उर्फ राजेश योगेन्द्रपालउर्फ राजेश पुरी याच्या साथीने गुन्हा केल्याचे समोर आले. दीपक मुरलीधर पनपालीया (वय 51, रा. मगोब, सुरत), अशोककुमार नैनचंद बाफना उर्फ अंकित जैन (रा.सारोली, सुरत, गुजरात), ललितकुमार तुलशीराम खंडेलवाल (वय 37, रा. सिरोही, राजस्थान), झाकीर नुरमोहम्मद हुसैन उर्फ राजेश पुरी (वय 48, रा. सैंदवा, जी. बडवानी, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
#Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बनावट नावं वापरून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाकड पोलिसांनी केली अटक…https://t.co/Or73pyL4E7#pimprichinchwad #arrested #fake #traders अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/bwE3YbJv6p
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2022
16 लाख 18 हजार 507 रुपयांचा माल जप्त
अपहार झालेल्या मालापैकी एकूण 16 लाख 18 हजार 507 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. वाकड पोलीस अधिक तपास सुरू आहे.