Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गजा मारणेच्या ‘त्या’ मिरवणुकीतील 100 जण गजाआड, आलिशान गाड्या, मोबाईलही जप्त!

गजा मारणे (Gaja Marne) आणि त्याच्या साथीदारांच्या मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस-वे'वर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या 100 जणांना पोलिसांनी आतापर्यंत गजाआड केलंय.

गजा मारणेच्या 'त्या' मिरवणुकीतील 100 जण गजाआड, आलिशान गाड्या, मोबाईलही जप्त!
पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 8:03 AM

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marne) आणि त्याच्या साथीदारांच्या मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’वर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या 100 जणांना पोलिसांनी आतापर्यंत गजाआड केलंय. या मिरवणुकीसाठी वापरलेल्या 27 महागड्या आलिशान गाड्या आणि 64 मोबाइल देखील पोलिसांनी जप्त केलेत. (Pune police Arrest gangster gajanan Marne 100 Supporter)

गजा मारणेची तीनशे गाड्यांसह मिरवणूक

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणेची मिरवणूक काढण्यात आली होती. त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले.

गजा मारणे लँड क्रुझरमध्ये

गजा बसलेल्या गाडीची किंमत तब्बल दोन कोटी रुपये होती. मिरवणुकीत असलेली लँडक्रझर गाडी पुण्यातील काही मोजक्याच लोकांकडे आहे. गजा मारणेची या गाडीतून मिरवणूक निघाल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली होती.

मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना पोलिसांनी उचललं

गजाच्या मिरवणुकीत गाड्या घेऊन सहभागी झालेल्यांची माहिती पोलिसांनी काढली. नंतर त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली. गजा मारणे ज्या गाडीत बसला होती, ती गाडी वडगाव शेरी येथून एका व्यक्तीकडून मागून आणल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा आकडा १०० झालाय, अशी माहिती कोथरुडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे यांनी दिली.

मिरवणूक काढणं अंगलट, मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू उचलणे, याचा ठपका गजा मारणेवर ठेवण्यात आला. तसेच गजा मारणेवर मोक्का कायद्याअंतर्गत कारावाई केली जाईल, असेही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणी गजासह 150 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गजा मारणेला फिल्मी स्टाईल बेड्या

हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेला गजा मारणे (Gajanan Marne) हवा करणारी मिरवणूक चांगलीच अंगलट आली. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या गजा मारणेला साताऱ्यातील जावळी तालुक्यात पोलिसांनी फिल्मी स्टाईल बेड्या ठोकल्या.

कोण आहे गजा मारणे? (Who is Gajanan Marne)

गजा उर्फ गजानन मारणे हे पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

(Pune police Arrest gangster gajanan Marne 100 Supporter)

हे ही वाचा :

Gaja Marne | दुहेरी हत्येतून सुटका, एक्स्प्रेस वेवर मिरवणूक ते पुन्हा अटक, कोण आहे गजा मारणे?

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.