Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Spa : औंधमधल्या स्पा सेंटरमध्ये अवैध धंदे! पोलिसांनी केला पर्दाफाश, व्यवस्थापकाला बेड्या

औंध (Aundh) येथील स्पा सेंटरमधून (Spa centre) चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पुणे शहर पोलिसांनी (Pune city police) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी स्पाच्या व्यवस्थापकाला अटक केली असून, थायलंडमधील चार महिलांसह सहा महिलांची सुटका केली आहे.

Pune Spa : औंधमधल्या स्पा सेंटरमध्ये अवैध धंदे! पोलिसांनी केला पर्दाफाश, व्यवस्थापकाला बेड्या
गुन्हा (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 11:49 AM

पुणे : औंध (Aundh) येथील स्पा सेंटर (Spa centre) येथून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पुणे शहर पोलिसांनी (Pune city police) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी स्पाच्या व्यवस्थापकाला अटक केली असून, थायलंडमधील चार महिलांसह सहा महिलांची सुटका केली आहे. एका गुप्त माहितीवर कारवाई करत, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाच्या पथकाने एका फसव्या ग्राहकाला औंध येथील ओरा स्पामध्ये पाठवले, असे एका निवेदनात म्हटले आहे. या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची पुष्टी केल्यानंतर, पोलिसांनी स्पावर छापा टाकला. त्यानंतर व्यवस्थापक श्याम पवार (32, लोणावळा) याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी या रॅकेटमध्ये अडकलेल्या दोन भारतीय आणि थायलंडमधील चार महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

चार महिलांच्या व्हिसाच्या तपशीलाची चौकशी सुरू

पोलिसांनी सांगितले, की त्यांनी कोंढवा येथील मनीष ईश्वर मुथा आणि राहुल जिगजानी यांच्यावर सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप केला आहे. सामाजिक सुरक्षा कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक म्हणाले, की चार महिलांच्या व्हिसाच्या तपशीलाची चौकशी सुरू आहे. न्यायालयाने स्पा व्यवस्थापकाला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पवार आणि जिगजानी यांना अजून अटक व्हायची आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी आयपीसीच्या कलम 370, 34 आणि अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायद्याच्या (पीआयटीए) कलमांनुसार चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आणखी वाचा :

Pune murder : डोक्यात दगड घालून रांजणगावात मित्राची हत्या; पोलिसांनी दोन तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Pune crime : मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक करून रुग्णाच्या जीवाशी खेळ! ‘ससून’च्या अधीक्षकांचं निलंबन

PMRDA : बेकायदा बांधकामांची खैर नाही; पुणे महापालिकेनंतर आता पीएमआरडीएही करणार कारवाई

विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.