पुणे : औंध (Aundh) येथील स्पा सेंटर (Spa centre) येथून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पुणे शहर पोलिसांनी (Pune city police) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी स्पाच्या व्यवस्थापकाला अटक केली असून, थायलंडमधील चार महिलांसह सहा महिलांची सुटका केली आहे. एका गुप्त माहितीवर कारवाई करत, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाच्या पथकाने एका फसव्या ग्राहकाला औंध येथील ओरा स्पामध्ये पाठवले, असे एका निवेदनात म्हटले आहे. या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची पुष्टी केल्यानंतर, पोलिसांनी स्पावर छापा टाकला. त्यानंतर व्यवस्थापक श्याम पवार (32, लोणावळा) याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी या रॅकेटमध्ये अडकलेल्या दोन भारतीय आणि थायलंडमधील चार महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी सांगितले, की त्यांनी कोंढवा येथील मनीष ईश्वर मुथा आणि राहुल जिगजानी यांच्यावर सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप केला आहे. सामाजिक सुरक्षा कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक म्हणाले, की चार महिलांच्या व्हिसाच्या तपशीलाची चौकशी सुरू आहे. न्यायालयाने स्पा व्यवस्थापकाला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पवार आणि जिगजानी यांना अजून अटक व्हायची आहे.
याप्रकरणी आयपीसीच्या कलम 370, 34 आणि अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायद्याच्या (पीआयटीए) कलमांनुसार चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले आहे.