पुणे : तडीपार गुंडाने चक्क सहाय्यक फौजदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune crime news) घडली आहे. तडीपार गुंड प्रवीण महाजनकडून (Pravin Mahajan) फरासखाना पोलीस ठाण्यातील (Faraskhana Police Station) सहाय्यक फौजदार समीर सय्यद (Pune ASI Sameer Sayyad murder) यांची हत्या केली. बुधवार पेठेतील (Budhwar Peth Pune) श्रीकृष्ण टॉकीजवळ हे हत्याकांड झालं. मध्यरात्री 1 च्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेनंतर गुंड प्रवीण महाजनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुंडाने चक्क पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याने पुणे शहर हादरुन गेलं आहे. (Pune Police ASI Sameer Sayyad murdered by tadipar goon Pravin Mahajan near Budhwar Peth crime news today)
शिवाय या कुख्यात गुंडाचं इतकं डेअरिंग कसं काय होऊ शकतं हा प्रश्न आहे. जर एखाद्या गुंडाची पोलिसाची हत्या करण्यापर्यंत मजल जात असेल, तर पुणे पोलिसांचा वचक राहिलाय की नाही हा प्रश्न आहे.
प्रवीण महाजन या गुंडावर अनेक खटले दाखल आहेत. त्याला तडीपार करण्यात आलं आहे. मात्र त्याने काल रात्री डाव साधत पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलला. केवळ हात उचलला नाही तर त्याची मजल थेट हत्येपर्यंत पोहोचली.
सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद (वय 48) हे काल ड्युटीवर होते. रात्री ड्युटी आरोपून ते घराकडे निघाले होते. त्यावेळी गुंड प्रवीण महाजनने त्यांना बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ रात्री 1 च्या सुमारास गाठलं. तिथे त्याने सय्यद यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्रवीण महाजनने समीर सय्यद यांचा गळा चिरला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे हत्याकांड नेमकं का झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या
जी भीती होती, ती अखेर खरी ठरली!; रोहित पवारांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
मोठी बातमी: राजीव सातवांच्या प्रकृतीत सुधारणा, ऑक्सिजन लेव्हल वाढली, उपचारांना प्रतिसाद