Pune : चुकीला माफी नाही! अखेर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी तब्बल 7 पोलिसांचं केलं निलंबन, PI चाही समावेश!
पुण्यातील सहकारनरगर पोलीस स्टेशन परिसराच्या हद्दीतील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्याती आल्याची माहिती समजत आहे.
पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी 7 पोलिसांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. निलंबन झालेल्या पोलिसांमध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि 2 पोलीस उपनिरीक्षक दोन पोलीस हवालदारांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील सहकारनरगर पोलीस स्टेशन परिसराच्या हद्दीतील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्याती आल्याची माहिती समजत आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर , पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोज एकनाथ शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर विठ्ठल शेंडे, पोलीस उपनिरीक्षक हसन मकबुल मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक मारूती गोविंद वाघमारे, पोलीस हवालदार संदीप जयराम पोटकुले आणि पोलिस हवालदार विनायक दत्तात्रय जांभळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यातील सहकारनरगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हवालदार संदीप जयराम पोटकुले आणि पोलिस हवालदार विनायक दत्तात्रय जांभळे हे दोघे सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल अंमलदार म्हणून पाहत होते. मात्र त्यांनी 4 अदखलपात्र गुन्ह्यांची तक्रार गांभीर्याने न घेतल्याने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन परस्पर गु्न्हे दाखल झाले होते. दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशी करण्यााचे आदेश आयुक्तांनी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांना दिले होते.
दरम्यान, दाखल झालेल्या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही, यामध्ये हसन मुलाणी आणि मारूती वाघमारे हे प्रमुख प्रतिबंधक कारवाई अधिकारी व घटनास्थळांचे चौकशी प्रभारी अधिकारी कार्यरत होते मात्र त्यांनीही यामध्ये हलगर्जीपणा केला. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी थेटे 7 जणांना खातात्यून बडतर्फ केलं आहे.