Pune Crime : पुणे पोलिसांनी शोधले किडनी रॅकेट प्रकरणातले कारनामे, अटकेतल्या एजंटांकडून धक्कादायक माहिती उघड

एजंट पैशाच्या व्यवहाराचे तपशील शेअर करत नाहीत. त्यामुळे एजंट ज्यांच्याशी संपर्कात होते ते डॉक्टर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि हॉस्पिटल पॅनल सदस्य शोधून काढणे पोलिसांना आवश्यक आहे.

Pune Crime : पुणे पोलिसांनी शोधले किडनी रॅकेट प्रकरणातले कारनामे, अटकेतल्या एजंटांकडून धक्कादायक माहिती उघड
गुन्हा (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 1:06 PM

पुणे : पुण्यातील किडनी प्रत्यारोपणाची (Kidney transplant) चौकशी करताना आता आणखी चार प्रकरणे समोर आली आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रवींद्र रोडगे आणि अभिजित गटणे या दोन एजंटांच्या कोठडीत चौकशीदरम्यान ही बाब उघड झाली आहे. शहर पोलिसांनी बुधवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयात (Magistrate’s Court) याविषयी सांगितले. संशयास्पद किडनी प्रत्यारोपणाशी या दोघांचे पूर्वीचे संबंध शोधण्यात पोलिसांना यश आले असले, तरी त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात कबूल केले आहे, की रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) प्रकरणात किंवा त्यांनी घेतलेल्या पैशांबद्दल दोघांनी फारसे काही सांगितले नाही. त्यामुळे पोलिसांनी दोघांच्या कोठडीत आठ दिवसांची वाढ करण्याची मागणी केली. सहायक सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी सांगितले, की दोन्ही एजंट आंतरराज्य टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

स्वतःची किडनी दान

सर्व तपशील उघड करण्यासाठी आणि एफआयआर नोंदवल्यापासून फरार असलेल्या काही संशयितांचा शोध घेण्यासाठी तपासकर्त्यांना पुरेसा वेळ हवा आहे. मात्र, न्यायालयाने या दोघांच्या कोठडीत 21 मेपर्यंत वाढ केली आहे. चार प्रकरणांपैकी, रोडगेने कल्याणीनगरमधील एका मुलीला तिच्या घरात घरगुती नोकर असल्याचा दावा करून स्वतःची किडनी दान केली होती, तर गटाणेने 2012मध्ये त्याचा काका असल्याचा दावा करून बेंगळुरूस्थित रिसीव्हरला त्याची किडनी दान केली होती, असे पोलिसांनी सांगितले.

खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया

या दोन्ही घटनांमध्ये दुसऱ्या एजंटने प्रत्यारोपणाची कागदपत्रे आणि ऑपरेशनची सोय केली होती. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. अहवालात असे म्हटले आहे, की सहा वर्षांपूर्वी, रोडगे आणि गटणे यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एका दात्याने बदलापूर येथील डॉक्टरच्या वडिलांवर कौटुंबिक मित्र दाखवून किडनी प्रत्यारोपणाची सोय करण्यासाठी प्रयत्न केले. ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

तपास कोरेगाव पोलिसांकडे

दीड वर्षापूर्वी चौथ्या प्रकरणातील दोघांनी पुण्यातील महिलेला पंढरपूर येथील एका पुरुषाला स्वीकारणाऱ्याची पत्नी दाखवून किडनी दान करायला लावली. ही शस्त्रक्रिया कोईम्बतूर येथील रुग्णालयात करण्यात आली, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे म्हणाले, की शहर गुन्हे शाखेने किडनी शस्त्रक्रिया प्रकरणाचा तपास आता कोरेगाव पार्क पोलिसांनी घेतला आहे. आम्ही सर्व कागदपत्रे आणि एफआयआरचा अभ्यास करू आणि अटक केलेल्या दोन दलालांची चौकशी करू.

एजंट ज्यांच्या संपर्कात होते, त्यांची चौकशी आवश्यक

फिर्यादी गायकवाड यांनी सांगितले, की एजंटांनी आधार आणि मतदार ओळखपत्रांच्या बनावटीशी संबंधित तपशील अजून दिलेला नाही. तसेच या प्रकरणात मिळालेले पैसे वसूल करण्यासाठी वेळ मागितला आहे. एजंट पैशाच्या व्यवहाराचे तपशील शेअर करत नाहीत. त्यामुळे एजंट ज्यांच्याशी संपर्कात होते ते डॉक्टर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि हॉस्पिटल पॅनल सदस्य शोधून काढणे पोलिसांना आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.