Pune Police : पोलीस कर्मचारी राजेश पुराणिक यांची आणखी एक दादागिरी, खोलीत डांबून नागरिकांना शिवीगाळ करत बेदम मारहाण
नागरिकांना अशाप्रकारे खोलीत डांबून, अश्लील भाषा वापरून बेदम मारहाण करण्याचा अधिकार राजेश पुराणिक यांना कोणी दिला, असा सवाल केला जात आहे. वेळोवेळी तक्रार करूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी पुराणिक यांना पाठीशी घालत असल्याचेच दिसत आहे.
पुणे : दादागिरी करत पोलीस कर्मचाऱ्याने नागरिकांना बंद खोलीत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) राजेश पुराणिक यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. कारवाई करत नागरिकांना बेदम मारहाण करण्याच्या प्रकाराचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Video viral) झाला आहे. या व्हिडिओत एका खोलीत काही जण खाली बसलेले दिसत आहेत. तर पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक एक एकाला धरून शिवीगाळ करून अमानुष पद्धतीने मारहाण करत आहेत. वादग्रस्त राजेश पुराणिक सध्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत आहे. त्यांच्या विरोधात अनेक लोकांनी अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई कठोर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलिसांनीच घेतला कायदा हातात
नागरिकांना अशाप्रकारे खोलीत डांबून, अश्लील भाषा वापरून बेदम मारहाण करण्याचा अधिकार राजेश पुराणिक यांना कोणी दिला, असा सवाल केला जात आहे. वेळोवेळी तक्रार करूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी पुराणिक यांना पाठीशी घालत असल्याचेच दिसत आहे. राजेश पुराणिक यांनी एक महिन्यापूर्वी वॉटर बारमध्ये जेवणासाठी आलेल्या महिला आणि मुलींना मारहाण केली होती. आता त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे.
बेदम मारहाणीचा व्हिडिओ
आधीही केलेत प्रताप
इंटिरिअर डेकोरेटरला मारहाण करून कानाला पिस्तूल लावणे, वाहनचालकांना शिवीगाळ यासह विविध प्रकारची दादागिरी राजेश पुराणिक यांनी केली आहे. काम चांगले नाही, म्हणून मारहाण करण्यात आली होती. या वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याची बदलीही मागील वर्षी वाहतूक शाखेतून विशेष शाखेत करण्यात आली होती. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये 323, 504, 506, 427 या कलमांखाली अदखलपात्र गुन्हाही अदखलपात्र गुन्हाही याप्रकरणी दाखल झाला होता.
दुचाकीसह उचलले
मागील वर्षीच नाना पेठेत एका वाहनचालकाला दुचाकीसह उचलून टेम्पोत भरण्याचा धक्कादायक प्रकार पुराणिक यांनी केला होता. यासह विविध वादग्रस्त कृत्ये त्यांनी केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.