Pune Building Slab Collapse : पुण्यातील स्लॅब दुर्घटना प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, चार जणांना अटक

गुरुवारी (3 फेब्रुवारी ) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम साइटवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी दहा ते पंधरा मजूर काम करत होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला होता.

Pune Building Slab Collapse : पुण्यातील स्लॅब दुर्घटना प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, चार जणांना अटक
पुण्यात स्लॅब कोसळून मजुरांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 7:43 AM

पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगर येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचे स्लॅब कोसळून(Pune Building Slab Collapse) झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणी ब्लू ग्रास बिझनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुष्यवधाचा सह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta) यांनी या संदर्भात माहिती दिली होती. आता या प्रकरणातील मोठी घडामोड समोर येत आहे. पुणे पोलिसांनी येरवडा स्लॅब कोसळल्याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. गुरुवारी (3 फेब्रुवारी ) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम साइटवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी दहा ते पंधरा मजूर काम करत होते. अचानक काम सुरू असताना लोखंडी जाळी खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर कोसळली. दहा जण अडकले होते. या दुर्घटनेनंतर(accident) सुमारे दोन तास सुरू असलेल्या मदत कार्यानंतर दुर्घटनेत अडकलेल्या मृत व गंभीर जखमी मजुरांना बाहेर काढण्यात आले.

चार जणांना अटक

पुणे पोलिसांनी येरवडा दुर्घटना प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. सिनिअर सेफ्टी सुपरवायझर इमतियाज अबुल बरकात अन्सारी, लेबर कॉक्ट्रक्टर सुपरवायझर मोहम्मद आलम,प्रोजक्ट मॅनेजर असिस्टंट विजय धाकतोडे, प्रोजक्ट मॅनेजर मजीद खान या चौघांना अटक करण्यात आली आहे. इमारतीचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू झाला होता. सदोष मनुष्यवधासह विविध कलमांनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जखमी कामगाराने दिलेल्या तक्रारीवरून बांधकाम व्यासायिकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच जण ठार, पाच जण जखमी

येरवडामधील ब्लू ग्रास बिझनेस पार्क येथील बांधकाम साइटवर स्लॅब साठी तयार करण्यात आलेली जाळी गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मजुरांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत पाच मजूर जागीच ठार झाले तर इतर पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी बांधकाम साइटवर सुरक्षेच्या योग्य उपाययोजना न करता मजुरांचा मृत्यूस गंभीर जखमी करण्यासाठी कारणीभूत म्हणून ब्लू ग्रास बिझनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शन यांच्या वर सदोष मनुष्यवधाचा सह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती.

दोषींवर कडक कारवाई करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

इतर बातम्या:

पुण्यात बांधकामग्रस्त इमारतीचा स्लॅब पडला, रात्रीच्या अंधारात मजुरांवर ‘काळ’ कोसळला

Pune Mall Collapse: 5 जणांचा जीव घेणारी घटना नेमकी कशी घडली? जमीन कुणाची? साईट कुणाची? सुरक्षा नियमांचे तीन तेरा?

Pune Police register case and arrest four people for Pune Yerawada Under Construction Mall Building Ground Floor Slab Collapse five Labours Death case

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.