Porsche Car Accident : दोन तासांत कॉलचा पाडला पाऊस; रक्त नमुना बदलण्यासाठी डॉक्टरवर असा टाकला दबाव

Blood Sample : कल्याणीनगरमधील पोर्श कार अपघात 19 मे रोजी घडला. दुसऱ्या दिवशी आरोपीचा रक्त नमुना बदलण्यात आल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या खुलाशानंतर सरकारी रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील मुख्य डॉक्टर अजय तवारे आणि डॉ. श्रीहरी हळनोर, अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे.

Porsche Car Accident : दोन तासांत कॉलचा पाडला पाऊस; रक्त नमुना बदलण्यासाठी डॉक्टरवर असा टाकला दबाव
अजून एक मोठा खुलासा
Follow us
| Updated on: May 29, 2024 | 9:07 AM

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. श्रीमंत अल्पवयीन मुलाने भरधाव कारने दोघांचा जीव घेतला. सुरुवातीला सर्वच यंत्रणा त्याला वाचविण्यासाठी धडपड करु लागली. याविषयी आवाज वाढला. देशभरातून संताप व्यक्त झाल्यानंतर बाल न्याय मंडळासह पोलिसांनी भूमिका बदलल्या. आता अजून एक खुलासा समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर मुलाचा रक्त नमुना बदलण्यासाठी आरोपी विशाल अग्रवाल याने सरकारी डॉक्टरांना दोन तासांत कॉलवर कॉल केल्याचे स्पष्ट झाले. त्याने डॉक्टरवर दबाव टाकल्याचे दिसून येते.

दोन तासांत 14 कॉल

ब्लड सॅम्पल बदलल्याचा खुलासा पोलिसांनी केला होता. त्याची चौकशी करण्यासाठी मंगळवारी तीन सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. समितीने ससून रुग्णालयाला भेट दिली. आता प्रकरणात एक खुलासा समोर आला आहे. अल्पवयीन आरोपीचा रक्त नमुना घेण्यापूर्वी डॉ. अजय तवारे आणि अल्पवयीन मुलाचे वडील आरोपी विशाल अग्रवाल यांच्यात दोन तासांत 14 व्हॉट्सॲप कॉल झाल्याचे समोर आले आहे. हे कॉल सकाळी 8:30 ते 10:40 या दरम्यान करण्यात आले. सकाळी 11 वाजता आरोपीचा रक्त नमुना घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

सरकारी डॉक्टरांना बेड्या

कल्याणीनगरमधील पोर्श कार अपघात 19 मे रोजी घडला. दुसऱ्या दिवशी आरोपीचा रक्त नमुना बदलल्याचा खुलासा पोलिसांनी केला होती. प्रकरणात सरकारी रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील मुख्य डॉक्टर अजय तवारे आणि डॉ. श्रीहरी हळनोर, अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. पैशांच्या बदल्यात रक्त नमुना बदल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाने दारुचे सेवन न केल्याचे सिद्ध करण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता.

कसा झाला अपघात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मे रोजी रात्री उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालचा अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रासह दारुची पार्टी केली. त्यासाठई 69 हजार रुपये खर्च केले. मित्रांसह तो त्याच्या पोर्श कारमधून भरधाव निघाला. त्यावेळी रात्रीचे दोन वाजून गेले होते. त्यानंतर कल्याणीनगरामध्ये नशेच्या अंमलात त्याने दुचाकीवरील दोघांना उडवले. त्यानंतर त्याला वाचविण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागल्याचे समोर आले आहे.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....