लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, नेपाळसुद्धा आता…
Prakash Ambedkar on BJP Loksabha Election 2024 : पुण्यात प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला. प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलं? नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. वाचा सविस्तर...
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. तसंच इतर देशांशी आपले संबंध चांगले नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी मी सगळ्यात स्ट्रॉंग नेता आहे, असं सांगत होते. देशाची सुरक्षा मी करू शकतो, असं वक्तव्य केलं होतं. पण आज परिस्थिती वेगळी आहे. सामान्य माणसाला याचा काहीच उपयोग झाला नाही. आज चीन आपल्या देशात घुसत आहे. राजनाथ सिंह म्हणतात की तिथले लोक भारतात यायला तयार आहेत, हे प्रचंड मोठा खोटं आहे. देशाच्या सुरक्षेला धोका आहे. नेपाळसुद्धा आता आपल्या देशाला चॅलेंज देत आहे. त्यांच्या नोटावर आपला असणारा भाग त्यांनी त्यांचा भाग दाखवला आहे. उत्तरखंड माधला हा सगळा भाग आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले…
तिथल्या पंतप्रधानांनी कॅबिनेट घेऊन हा निर्णय घेतला आहे. मालदीवसोबत वैयक्तिक प्रॉब्लेम झाल्याने यांनी तिथली आर्थिक मदत बंद केली आहे. मालदीव विरोधत कारवाई केली जात आहे. सरकार यावर काहीच बोलल नाही. मालदीव आपल्या सुरक्षचेच्या दृष्टीने महत्वाचं बेट आहे. अफगाणिस्तान आता तालिबान चालवत आहे. बांगलादेश सोबतचे आपले संबंध बिघडत चालले आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
इतर देशांसोबतच्या संबंधांवर भाष्य
बाजूचा केवळ भूतान आपल्यासोबत इतर सगळ्या देशांशी संबंध बिघडले आहेत, हे लक्षात येत आहे. आपले शेजारी देश आपल्याला सोडून गेले आहेत. आपण एकटे पडले आहोत हा खूप मोठा धोका आहे. जर्मनी, फ्रांस हे देश देखील आपल्या पासून अंतर ठेवत आहेत. हे सरकार 2024 मध्ये जर निवडून आल तर इतर देश कायदा करतील. इतर देशातील किती लोक आपल्या देशात राहणार याचा सगळ्यात जास्त फटका आपल्या भारताला बसणार आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
निर्मला सीतारामन या मोदींच्या व्हॉईस आहेत तर त्यांचे पती देशाचा व्हॉइस आहेत. मणिपूरमध्ये जे घडलं त्यावर आपले लोक गंभीर विचार करत नाहीत हे दुर्दैव आहे. दहा वर्षांत मोदी सपशेल अपयशी ठरले आहेत. सगळयांनी मोदी आणि धर्म प्रेमातून बाहेर पडा, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.