कोरोनामुक्तीचं आडाचीवाडी मॉडेल, युवाशक्तीनं करुन दाखवलं; गावातून कोरोना हद्दपार
आडाचीवाडी येथील युवकांनी एकत्र येत गावातील कोरोनाला हद्दपार करण्याचा व गाव कोरोनामुक्त करण्याचा विडा उचलला. Purandar Adachiwadi Village Covidfree
पुणे: पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी येथील युवकांनी एकत्र येत गावातील कोरोनाला हद्दपार करण्याचा व गाव कोरोनामुक्त करण्याचा विडा उचलला. युवकांच्या प्रयत्नांमुळे गावात दोन महिन्यापूर्वी 25 कोरोना रूग्ण होते तेथे आज कोरोनाची रुग्ण संख्या शून्य झाली आहे. गावातील युवकांनी अतिशय पद्धतशीरपणे केलेल्या या प्रयत्नांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. (Pune Purandar Adachiwadi Village youths successful in make Covidfree village during two months )
युवाशक्तीचा पुढाकार
आडाचीवाडी हे वाल्हे ग्रामपंचायतीमधुन विभक्त झालेले छोटंसं गाव आहे. गावची लोकसंख्या अवघी 700 आहे. गावामध्ये आरोग्यासह सर्व सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला आर्थिक बंधने येत होती. त्यातच कोरोनाने सुद्धा डोके वर काढल्याने गावामध्ये दोन महिन्यापूर्वी तब्बल 25 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते. कमी खर्चामध्ये आरोग्य सुविधा कशी सुधरायची?, कोरोना बाधितांचा आकडा शुन्यावर आणायचा? अशी मोठी आव्हाने समोर उभी असताना गावातील युवा शक्ती पुढे आली. युवकांनी गाव कोरोनामुक्त करण्याचा विडा उचलला.यामध्ये गावातील विशाल पवार, प्रफुल्ल पवार, उज्वल पवार, अनिकेत पवार, संदिप चव्हाण, मंगेश पवार, स्वदेश पवार आदि तरुणांसह आशा वर्कर सुजाता पवार, मदतनीस मंदाकिनी पवार सहभागी झाले,अशी माहिती सरपंच दत्तात्रय पवार यांनी दिली.
शरीराचं तापमान आणि ऑक्सिजन तपासणी
सुरवातीच्या टप्प्यामध्ये या युवकांनी गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा केली. प्रत्येक व्यक्तीचं आठवड्यातून दोन वेळा शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी मोजण्यास सुरवात केली. आठवड्यातून दोन वेळा होणाऱ्या या सर्वेक्षणामुळे आणि उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे कोरोनाचे संक्षयित रुग्ण सापडू लागले. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांवर उपचार होत गेले.यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात राहण्यास मदत झाली.
शाळेत विलगीकरण कक्ष सुरु
पुढच्या टप्प्यात त्यांनी सर्वसाधारण लक्षणे असलेल्या आणि तब्येत चांगली असलेल्या रूग्णांसाठी शाळेत विलगीकरण केंद्र सुरू केले. हे करताना त्या रूग्णांसाठी वेळ पडल्यास पुण्यातील डॉक्टर मित्रांशी संपर्क साधून ती औषधे उपलब्ध करुन देत उपचार सुरू केले. या युवकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे दृष्य परिणाम आता दिसत आहेत.दोन महिन्यांपूर्वी या गावामध्ये 25 च्या वर कोरोनाबाधित रूग्ण होते. आज गावात आज शुन्य रूग्ण संख्या आहे, असं तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत पवार यांनी सांगितलं.
एकीकडे कोरोनानं शहरी भागासह ग्रामीण भागालाही ग्रासलेलं असताना आडाचीवाडी गावातील युवकांनी एकत्र येत गाव कोरोनामुक्त केलंय.
PSI भरतीबाबत MPSC चा मोठा निर्णय, मुलाखतीसाठी आता शारीरिक चाचणीत 60 गुण आवश्यक https://t.co/0csVdaZX9h @mpscexams @CMOMaharashtra @OfficeofUT @RRPSpeaks @GopichandP_MLC @Dev_Fadnavis #mpsc #MPSCExam #PSIRecritment #PhysicalTest #MahjarashtraPublicServiceCommission
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2021
संबंधित बातम्या:
(Pune Purandar Adachiwadi Village youths successful in make Covidfree village during two months )