पुण्यात मध्यरात्री मुसळधार पावसाने पूरसदृश्य स्थिती! नेमका किती पाऊस झाला? आकडेवारी समोर

पुण्यात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आज दिवसभर कसं राहणार हवामान? IMDने सांगितलं

पुण्यात मध्यरात्री मुसळधार पावसाने पूरसदृश्य स्थिती! नेमका किती पाऊस झाला? आकडेवारी समोर
पुण्यात मुसळधारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 10:35 AM

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे : सोमवारी रात्री उशिरा पुण्यात जोरदार पावसाची शक्यता (Pune rains) वर्तवण्यात आली होती. त्यानुसार मध्यरात्री उशिरापर्यंत तुफान पाऊस पुणे जिल्ह्यात सर्वदूर झाला. सोमवारी रात्री झालेल्या पावसानंतर आता आज दिवसभरही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुण्याच्या (Pune Rain Video) बहुतांश भागाला रात्री झालेल्या पावसाने चांगलंच झोडपून काढलं होतं. अनेक वाहनं पावसाच्या पाण्यात अडकली. वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला. काही घरांमध्येही पावसामुळे पाणी शिरलं. तर पुणे स्टेशनसह (Pune Station) दगडूशेठ मंदिर परिसरही मुसळधार पावसामुळे जलमय झाला होता.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मगरपट्ट्यात तब्बल 116 मिलीमीटर तर शिवाजी नगर परिसरात 104.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय. पहाटे अडीच वाजेपर्यंत पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली होती. रात्री झालेल्या पावसाचा परिणाम सकाळपर्यंत कायम होता.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ

पुणे सोलापूर महामार्गावरची वाहतूक मुसळधार पावसामुळे मंदावली होती. अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. रस्त्यावरही पाणीच पाणी पाहायला मिळालं होतं. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापनही सज्ज झालंय. परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पुणेकरांची दाणादाण उडवली होती. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणाला अलर्टवर राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोणत्या भागात किती पावसाची नोंद?

पुण्यातील अलका टॉकीज परिसरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं होतं. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून कार, दुचाकी चालकांना वाट काढताना कसरत करावी लागत होती. तर इकडे कोंढवा, हडपसर, येवलेवाडी भागातही रस्तेदेखील जलमय झाले होते. दरम्यान, सोमवार पेठेत पावसानं रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी पाण्याबरोबर वाहून गेल्या.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.