‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांची निराशा; माजी खासदाराचा शिंदे सरकारवर निशाणा
Raju Shetti on Ladki Bahin Yojna : शिंदे सरकारने 'लाडकी बहीण' योजना आणली आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी यांनी यावर मत मांडलं आहे. त्यांनी या योजनेवर टीका केली आहे. राजू शेट्टी काय म्हणाले? वाचा सविस्तर...
अनेक बहिणी ‘लाडकी बहीण’ या योजनेसाठी रांगा लावून उभ्या आहेत. अनेक ठिकाणी सर्वर डाऊन झाल्याने ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रत्येक बहिणीला वाटते की मला 1500 रुपये मिळणार आहेत. मात्र सरकारने अनेक नियम अटी लावल्यात त्यामुळे अनेक बहिणीची निराशा होणार आहे. सरकारचं धोरण समजत नाही. विधवा महिलेला 1000 आणि सक्षम महिलांना 1500 नक्की सरकारचे चाललं काय? सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बदमाश आहेत. त्यांनी लोकांचे प्रश्न सोडविले पाहिजेत, असं माजी खासदार राजू शेट्टी म्हणालेत. शिंदे सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.
राजू शेट्टी आक्रमक
दूध दरावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. राजू शेट्टी यांनीही दुधाला योग्य भाव मिळाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. दुधाच्या दरात वाढ व्हावी. म्हणून अजून आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. काही ठिकाणी मंत्र्यांना दुधाचा अभिषेक घालणार आहोत. त्यानंतर मुंबईला जाणारे दूध पुरवठा अडवणार आहोत. दूध उत्पादकाला बाजारभाव मिळत नाही. कारण राज्यात 50 ते 60 लाख दुधावर प्रक्रिया करून पावडर आणि बटर केले जाते. दूध पावडर करणाऱ्या कंपन्यांनी खरेदीचा भाव खाली आणले आहे. त्याचा परिणाम दुधांचे नाव कमी झाले आहे, असं राजी शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टी काय म्हणाले?
दूध उत्पादक शेतकरी 7 ते 8 रुपये तोट्यात दूध विक्री करत आहेत. दुधाची परिस्थिती अशीच राहिली तर शेतकऱ्याच्या गोठ्यातील जनावरे कमी होतील. राज्याला दूध टंचाईला सामोरे जावं लागेल. दूध उत्पादक शेतकऱ्याने उत्पादनावर पाठ फिरवीली एक वेगळी समस्या निर्माण होईल. राज्य आणि केंद्र सरकारने संयुक्त रित्या उपाययोजना करावी. अतिरिक्त दूध पावडरची विल्हेवाट लावली पाहिजे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
किमान 40 दुधाला भाव मिळाला पाहिजे. तेव्हा दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडले. 35 रुपये भाव दिल्याने शेतकऱ्याचे समाधान होणार नाही. शेतकऱ्याची मागणी ही 40 रुपये आहे. सरकार 35 रुपये भाव देईल यांची शास्वती नाही. मागे 34 रुपये भाव सरकारने देण्याचे ठरविले होते. मात्र एकाही दूध संस्थेने भाव दिला नाही. या आदेशाला केराची टोपली दाखविली होती. सरकारने हमी घेतली पाहिजे की बाजारभाव हा 40 रुपये मिळेल, असंही राजू शेट्टी म्हणाले.