देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची बोलणी झाली आहे. रिपाइंला एक मंत्रिपद राज्यात आणि विधानसभा निवडणुकीत 10 जागा देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. केंद्रात एक मंत्रिपद आम्हाला मिळेल, असाही शब्द देण्यात आला आहे, असं रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मला जरा तिकीट दिल नाही तरी मी सोबत आहे. मी राज्यसभेवर आहे. पण आम्हाला एकतरी जागा मिळावी अशी अपेक्षा होती. महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असते तर नक्की मिळाली असती. आपली राज्यसभा 2026 पर्यंत आहे त्यांनंतर देखील मिळेल. जागा मिळाली नसली तरी मी महायुतीसोबत आहे. माझा बिनशर्त पाठिंबा नाही, असंही आठवले म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
प्रकाश आंबेडकर आमच्या समाजातील ज्येष्ठ आणि अभ्याससू नेते आहे. कधी काय करायचं त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांना येणाऱ्या निवडणुकित यश मिळणार नाही. महादेव जानकर शरद पवार यांना भेटले. म्हणून त्यांना जागा मिळाली मी नाही भेटलो, म्हणून जागा मिळाली नाही, असं आठवलेंनी म्हटलंय.
शरद पवार यांना मी दिल्लीत रोज भेटतो. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आमची मैत्री आहेच. जशी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती. तशीच आमची देखील आहे. भविष्यात अजून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मी करेन. आता अजित पवार आमच्यासोबत आले आहेत. शरद पवार राहिले भविष्यात विचार करू, असं रामदास आठवले म्हणालेत.
बारमतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. यावर रामदास आठवलेंनी भाष्य केलंय. पवार विरुद्ध पवार हा संघर्ष नव्हता पाहिजे. तीन वेळा निवडणुका लढवली असल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीला उभे नव्हतं राहायला पाहिजे. मागच्या वेळी कांचन कुल होत्याच आता अजित पवारांचे मत त्यामध्ये वाढतील. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार निवडून येतील. अजित पवार यांच्यासोबत पॉवर आहे. तर सुप्रिया सुळे यांच्यासोबत पवार आहेत, असं रामदास आठवले म्हणाले.