लम्पीच्या प्रसारात झपाट्याने वाढ, पुण्यातील 76 गावांमध्ये लम्पीचा प्रसार
लम्पीच्या प्रसारानं शेतकरी सध्या चिंतेत आहे. पुणे जिल्ह्यातही लम्पीचा प्रसार झपाट्याने वाढतोय.
पुणे : लम्पीच्या प्रसारानं (Lumpy Spread) शेतकरी सध्या चिंतेत आहे. पुणे जिल्ह्यातही लम्पीचा प्रसार झपाट्याने वाढतोय. पुणे जिल्ह्यात (Pune) 76 गावात लम्पीचा प्रसार व्हायला सुरूवात झाली आहे. पुढील 15 दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यात तातडीने जनावरांचं लसीकरण करायला सुरुवात केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी घाबरू नये. आपल्या जनावरांना लम्पीची लक्षण दिसल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावं, असं आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं आहे. 500 गावांमध्ये लसीकरण कसं केलं जावं याबाबत चाचपणी सुरु आहे. या लसीकरणासाठी 25 लाखांच्या औषधांची गरज आहे. जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आहे.