हा तर फक्त ट्रेलर पिक्चर अभी बाकी है…; रोहित पवारांचं सूचक विधान

NCP MLA Rohit Pawar Baramati Daura for Loksabha Election 2024 : रोहित पवार आज बारामतीत; प्रचार दौऱ्यादरम्यान रोहित पवारांचं सूचक विधान.. बारामती मतदारसंघात रोहित पवार दौरा करत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी काय म्हटलं? वाचा...

हा तर फक्त ट्रेलर पिक्चर अभी बाकी है...; रोहित पवारांचं सूचक विधान
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 11:16 AM

निलेश लंके आता आपले नगरचे उमेदवार असणार आहेत काल त्यांनी राजीनामा दिला. त्यांचं मन तिकडं जमत नव्हतं. ते लोकांशी बोलले आणि त्यांनी मत बनवलं. लोकांनी सांगितलं की लोक शरद पवारसाहेबांसोबत आहेत. हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है… अनेक आमदार आमच्या आणि शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेकजण परत येण्यासाठी इच्छुक आहेत, असं आमदार रोहित पवार म्हणालेत. बारामती लोकसभा मतदारसंघात रोहित पवार यांचा प्रचार दौरा सुरु आहे. यावेळी स्थानिकांशी बोलताना रोहित पवारांनी हे विधान केलं आहे.

बारामतीकडे देशाचं लक्ष

आपल्या इथल्या सामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. अनेक प्रश्न सुप्रिया सुळे यांच्या हातात आहेत. ते देखील सोडवण्यासाठी सुप्रिया ताईंनी प्रयत्न केला आहे. इथल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचा… सगळ्या महाराष्ट्रभरातून लोक इथं आलेले आहेत. या मतदार संघात राज्यभरातून लोक येतात. ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. भाजपकडून आपल्या विचारांवर घाव घालण्याचा प्रयत्न होत आहे. आपण लोकांना दाखवून द्यायचं की बारामती ही फक्त पवारसाहेबांचीच आहे…, असं रोहित पवार म्हणाले.

बारामतीत 2014 मध्ये यश आलं नाही. आता त्यांनी खूप मोठी ताकत लावली आहे. पुरोगामी विरूद्ध प्रतिगामी अशी ही लढाई आहे. सुप्रिया सुळे किती मतांनी निवडणून येतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.

भाजप घाबरलंय- रोहित पवार

भोरमधल्या सभेला संजय राऊत यांचं हेलिकॉप्टर लँड होऊ देत नव्हते. प्रशासनाकडून आपल्यावर मोठा दबाव टाकला जात आहे. अनेक ठिकाणी गुंडाचा वापर केला जात आहे. ते लोक काहीही करू शकतात. ते लोक बूथ देखील ताब्यात घेतील. त्यांनी पगारी लोक ठेवले आहेत. आपलं वातावरण लई भारी आहे… बारामतीत विजय आपलाच आहे. सगळ्यांनी टार्गेट घेऊन काम करा. अख्ख्या महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे भाजप आता घाबरला आहे, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.

शिवतारेंना टोला

विजय शिवतारे यांचं नाव न घेता रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. ते मध्ये फार बोलले फार बोलले. पण आता काही ऍडजेस्टमेंट झाली वाटतं… आता माघार घेतली असेल. पण आधी जे बोलला आहात ते व्हीडिओ आहेत की…, असं म्हणत रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे विजय शिवतारे यांना खोचक टोला लगावला आहे.

सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.