Pune Sachin Kharat : तुमचंच रक्त मनुवादी आहे, ते आधी बदलून घ्या म्हणजे बाष्कळ बडबड थांबेल, सचिन खरात यांचा संभाजी भिडेंना टोला

संभाजी भिडे यांची बडबड बाष्कळ आहे. असल्या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध करत त्यांनी संभाजी भिडेंवर टीका केली आहे. या देशाला म्लेंच बाधा, दुसरी आंग्ल बाधा, तिसरी गांधी बाधा झाली आहे, असे वक्तव्य भिडेंनी केले होते.

Pune Sachin Kharat : तुमचंच रक्त मनुवादी आहे, ते आधी बदलून घ्या म्हणजे बाष्कळ बडबड थांबेल, सचिन खरात यांचा संभाजी भिडेंना टोला
संभाजी भिडेंवर टीका करताना सचिन खरातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 2:09 PM

पुणे : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणतात, या देशाला म्लेंच्छ बाधा, दुसरी आंग्ल बाधा, तिसरी गांधी बाधा झाली आहे. यावर त्यांनी उपाय सांगितला आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांचे रक्त भारतातील जनतेत पाहिजे. परंतु संभाजी भिडे महाराष्ट्र राज्यातील जनतेचे रक्त (Blood) हे रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, अहिल्याबाई होळकर, फुले, शाहू, आंबेडकर यांच्याच विचाराचे रक्त आहे. तुमचे रक्त मनुवादाचे आहे, ते बदला आणि तुमच्या मनात हेडगेवार, गोळवलकर, उपाध्याय, मुखर्जी आहेत आणि तोंडात रयतेचे राजे शिवाजी महाराज आणि संभाजी राजे आहेत. त्यामुळे तुमचे मनुवादी रक्त बदलून घ्या आणि रयतेचे राजे शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांचे करून घ्या. मग तुमची बाष्कळ बडबड आणि चिथावणीखोर भाषा थांबेल, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे.

संभाजी भिडेंचे वक्तव्य

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले संभाजी भिडे यांनी आणखी एक वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे. या देशाला म्लेंच्छ बाधा, दुसरी आंग्ल बाधा, तिसरी गांधी बाधा झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर आपल्या जनतेत छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी राजांचे रक्त हवे, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा सचिन खरात यांनी समाचार घेतला आहे. संभाजी भिडे यांची ही बाष्कळ बडबड आहे. असल्या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध करत त्यांनी संभाजी भिडेंवर टीका केली आहे.

आणखी वाचा :

पुणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणार, पुणे पालिकेचा दावा; मात्र आतापर्यंत नाले अन् पावसाळी गटारांची झालीय अवघी 8 टक्केच स्वच्छता

Ed action : ईडीनं जप्त केली पुण्यातल्या ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टची साडेआठ कोटीच्या मालमत्ता

Pune IMD : काहीसं दिलासादायक; एप्रिलमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त थंड पुणे, काय म्हणतोय IMDचा डेटा?

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.