निवडणुकीआधी तिसऱ्या आघाडीची बैठक; ‘त्या’ दोन बड्या नेत्यांना सोबत घेण्यासाठी हालचाली

Pune Meeting For Third Front : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी तिसऱ्या आघाडीची शक्यता आहे. यासाठी आज पुण्यात बैठक होत आहे. कोण- कोणते नेते या बैठकीला उपस्थित राहणार? बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? तिसरी आघाडी होण्याची शक्यता किती आहे? वाचा सविस्तर...

निवडणुकीआधी तिसऱ्या आघाडीची बैठक; 'त्या' दोन बड्या नेत्यांना सोबत घेण्यासाठी हालचाली
संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडूImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 11:10 AM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी व्यतिरिक्त तिसरी आघाडी राज्यात स्थापन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वारंवार बैठका होत आहेत. आजही पुण्यात महत्वाची बैठक होणार आहे. पुण्यात आज तिसऱ्या आघाडीची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा होणार आहे. तसंच आगामी निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. या बैठकी आधी राजू शेट्टी यानी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मोठं विधान तेलं आहे.

तिसऱ्या आघाडीची आज बैठक

पुण्यात आज तिसऱ्या आघाडीची बैठक होणार आहे. छत्रपती संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांची एकत्रित बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि ओल्या दुष्काळाच्या केलेल्या पाहणीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त भागात जाऊन एकत्रित पाहणी केली होती. आज पुण्यात पुन्हा बैठक होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी उमेदवार देण्याबाबतही चर्चा होणार असल्याचं कळतं आहे.

त्या दोन नेत्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न

तिसऱ्या आघाडीच्या बैठकीआधी राजू शेट्टी यांनी मोठं विधान केलं आहे. दोन बड्या नेत्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं त्यांनी म्हटलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना एकत्र घेण्याबाबत चर्चा सुरु आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील हे तिसऱ्या आघाडीत सामील होणार की नाही?  हे येत्या काळात पाहावं लागेल.

आम्ही एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहोत. एकत्र येताना किमान समान कार्यक्रमावर काही मुद्द सोडावे लागतील. महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांनी काय दिवे लावलेत. आम्ही काय तिसरी आघाडी नाही त्यांनी महाराष्ट्रच काय केलंय त्यांना पाहिलं आणि दुसर काय म्हणायचं. आम्ही निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी एकत्र येत आहोत. चुलत्या पुतण्याच्या वादात आम्हाला पडायचं नाही. मात्र जे जग प्रसिद्धीच आहे. चिमूटभर आणि मूठभर सांगायचं त्याचा कमी अधिक फटका माझ्यासहित सगळ्यांना बसतोय, असं राजू शेट्टी या बैठकीआधी म्हणाले.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.