Pune Samir Bagsiraj : देवदूत बनून आला अन् चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर! पुण्याच्या समीर बागसिराज यांचं सर्व स्तरातून कौतुक

पुणे : मुंबई-पुणे हायवेवरील (Mumbai-Pune highway) वारजे भागातील पुलावर वाहनांची गर्दी झाली होती. आंबेगावच्या दिशेने निघालेल्या कोथरूडमधील पुराणिक कुटुंबावर काळाने आघात केला. त्यांच्या चारचाकी मोटारीला एका ट्रकने मागील बाजूने धडक दिली. या अपघातात मनोज पुराणिक, त्यांच्या पत्नी, दोन मुली या जखमी अवस्थेत मदतीच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूककोंडी (Traffic) झाली होती. या […]

Pune Samir Bagsiraj : देवदूत बनून आला अन् चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर! पुण्याच्या समीर बागसिराज यांचं सर्व स्तरातून कौतुक
चिमुरडीला रुग्णालयात दाखल करताना समीर बागसिराजImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 4:31 PM

पुणे : मुंबई-पुणे हायवेवरील (Mumbai-Pune highway) वारजे भागातील पुलावर वाहनांची गर्दी झाली होती. आंबेगावच्या दिशेने निघालेल्या कोथरूडमधील पुराणिक कुटुंबावर काळाने आघात केला. त्यांच्या चारचाकी मोटारीला एका ट्रकने मागील बाजूने धडक दिली. या अपघातात मनोज पुराणिक, त्यांच्या पत्नी, दोन मुली या जखमी अवस्थेत मदतीच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूककोंडी (Traffic) झाली होती. या वाहतूककोंडीतून रुग्णवाहिका वेळेवर पोहोचणे शक्यच नव्हते. वाहतूक कोंडी झाल्यामुळे वारजे वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळावर दाखल झाले खरे… पण गर्दी इतकी भयानक होती, की त्यांनादेखील हालचाल करणे शक्य होत नव्हते. पण या अपघातप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी समीर बागसिराज (Samir Bagsiraj) यांनी या आठ वर्षीय जखमी चिमुरडीला क्षणार्थात स्वत:च्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धावायला सुरुवात केली. त्यांच्या मदतीला राम नवले हे रिक्षाचालकही धावून आले. तिला वेळेत उपचार मिळाले.

माणुसकी हा एकच धर्म

एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी, किंवा असा प्रसंग केवळ चित्रपटात पाहता येईल, असे तुमचे मत झाले असेल तर त्याला छेद देणारीच आणि अभिमान वाटावा, अशी ही घटना पुण्यात घडली आहे. राज्यात एकीकडे मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र माणुसकी हा एकच धर्म असल्याचे दर्शन घडले आहे. पुण्यातील वारजे येथील पुलावर झालेल्या अपघातात जखमी चिमुरडीला वाहतूक पोलीस समीर बागसिराज यांनी नव संजीवनी दिली आहे. समीर बागसिराज यांनी केलेल्या मदतीचे आज सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मानले समीर बागसिराज यांचे आभार

या अपघातात चिमुकलीचे आई-बाबा आणि बहीण यांनाही गंभीर दुखापत झाली होती, परंतु ते कसेबसे रुग्णालयात दाखल झाले. समीर बागसिराज यांनी केलेल्या कामगिरीमुळे चिमुकलीचे बाबा मनोज पुराणिक यांनी खूप आभार मानले. समीर बागसिराज यांनी केलेल्या या मदतीने खरा तो एकचि धर्मचा संदेश गेला, हे नक्की…

सुप्रिया सुळेंकडून कौतुक

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही समीर बागसिराज यांचे कौतुक केले आहे. तसेच पुणे पोलिसांकडूनही बागसिराज यांचा सत्कार करण्यात आला. राजकारणातील मंडळींनी जाती-जातीत तेढ किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी अशा घटनांनी एक चांगला संदेश जात असून राजकीय मंडळींना त्यांच्याच राजकीय भाषेत एका प्रकारे चपराकच म्हणावी लागेल.

आणखी वाचा :

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेला अयोध्येतून येणार कार्यकर्ते; सभेची तयारी जोरात

Pune ST Accident : ब्रेक फेल झाल्यानं धडकली एसटी; पुण्यातल्या शंकर महाराज पुलावरचा थरार, तीन जखमी

Krishnaprakash : ‘वक्त तो वक्त है’ म्हणत व्यक्त झाले आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश; बदलीवर नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.