Video : सणसवाडी MIDC तील फायबर मोल्डिंग कंपनीला भीषण आग
पुण्याच्या सणसवाडी MIDC तील फायबर मोल्डिंग कंपनीला भीषण आग लागलीये. प्रचंड धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. | Pune Sanaswadi MIDC
पुणे : पुण्याच्या सणसवाडी MIDC तील फायबर मोल्डिंग कंपनीला भीषण आग लागलीये. प्रचंड धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Pune Sanaswadi MIDC Fiber Molding Company Fire)
शिरूर तालुक्यातील पुणे महामार्गालगत असलेल्या सणसवाडी औद्योगिक परिसरातील एका कंपनीला सकाळी ११च्या सुमारास भीषण अशी आग लागली आहे. सणसवाडीजवळील एल अँड टी फाटा येथील ब्राईट कंपनीला ही भीषण आग लागली. आगीने संपूर्ण कंपनीला वेढा घेतला असून घटनास्थळी काळ्या धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसत आहेत. या प्रचंड आशा धुरामुळे आग विझविण्याचा अडथळे येत आहे.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, सदर कंपनीच्या चारही बाजूने अनेक कंपन्या असून त्या कंपन्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहेत. आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांना आग विझवण्यासाठी थर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. (Pune Sanaswadi MIDC Fiber Molding Company Fire)
पाहा व्हिडीओ
हे ही वाचा :
नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा
चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानामुळे गजहब, राष्ट्रवादीकडून थेट अटलजींच्या ‘राजधर्माची’ आठवण