Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊतसाहेब एवढं बोलता, भीती वाटत नाही का?; सुषमा अंधारेंच्या प्रश्नावर राऊतांचं सविस्तर उत्तर…

Sanjay Raut Interview by Sushma Andhare : ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंनी घेतली संजय राऊतांची मुलाखत; अंधारेंचे प्रश्न अन् राऊतांची दिलखुलास उत्तरं... पुण्यात होतेय खास मुलाखत. अंधारेंनी विचारलेल्या प्रश्नांना संजय राऊतांनी काय उत्तरं दिली? वाचा सविस्तर...

राऊतसाहेब एवढं बोलता, भीती वाटत नाही का?; सुषमा अंधारेंच्या प्रश्नावर राऊतांचं सविस्तर उत्तर...
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 2:49 PM

अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 29 जानेवारी 2024 : पुण्यात आज एक वेगळी मुलाखत होत आहे. पुण्यात आज संजय राऊत यांची प्रकट मुलाखत होतेय. शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या संजय राऊत यांची मुलाखत घेतायेत. पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात सुषमा अंधारे संजय राऊत यांची मुलाखत घेत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये आज पुण्यात रंगतेय. या मुलाखतीत सुषमा अंधारे राऊतांना प्रश्न विचारत आहेत. अंधारेंच्या प्रश्नांना संजय राऊत दिलखुलास उत्तरं देत आहेत.

सुषमा अंधारेंचा पहिला प्रश्न

सुषमा अंधारे यांनी पहिला प्रश्न विचारताच सभागृहात हशा पिकला. संजय राऊतसाहेब तुम्ही एवढं बोलता. भीती वाटत नाही का?, असा प्रश्न अंधारेंनी विचारला. त्याला संजय राऊतांनी उत्तरं दिलं.मी आशा व्यासपीठावर पक्षीय कधी नसतो. गेल्या 40 वर्षात माझ्यावर अनेक शिक्के लागले. कधी शरद पवारांचा माणूस तर कधी काँग्रेसचा माणूस… पण मी सच्चा शिवसैनिक आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मागच्या 40 वर्षांपासून मी शिवसेनेतच आहे. ज्या माणसाने 40 वर्षे बाळासाहेब यांच्यासोबत काढली त्याला भीती कशी वाटेल?, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांचं रोखठोक उत्तर

आमचा अनेक लोकांना ईडीने बोलावलं आहे. मी त्यांना फोन केला. बिनदास्त जा मी पण जाऊन आलोय. मला कधी भीती वाटली नाही. राजकारणात ज्या ज्या भयंकर गोष्टी करायच्या आहेत. त्या सगळ्या मी केल्या आहेत. आमच्यासाठी शिवसेना हा राजकीय पक्ष नाही किंवा सत्ता घेण्यासाठीच साधन नाही, असं राऊत म्हणाले.

भीती खुंटीला टांगावं लागतं- राऊत

सार्वजनिक जीवनात भीती बाजूला खुंटीला टांगून ठेवावी लागते. आम्ही डोळ्याने रक्तपात आणि हिंसाचार पहिला आहे. आपला विरोधक एक तर जेलमध्ये टाकतो. गेल्या 5, 10 वर्षात जास्ती होत आहे, असंही राऊतांनी म्हटलं. एवढं बोलता मग भीती वाटत नाही का, या सुषमा अंधारेंच्या प्रश्नाला संजय राऊतांनी उत्तर दिलं.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.