पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये महाविकास आघाडीची आज सभा होतेय. या सभेत महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित होते. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. भाषणाच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी अजित पवार यांची जुनी क्लिप दाखवली. तू काय- काय केलं हा प्रश्न महत्वाचा आहे. तू काही नाही केलं. आयत्या बिळावर नागोबा झाला, असं म्हणत क्लिपवरून संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
ज्या पवारांनी पक्ष वाढवायला तुमच्या हातात दिला, तुम्ही कायं केलं? आचार्य अत्रे म्हणाले असते असे हराम#X# 10 हजार वर्षात झाले नाही, असं म्हणाले असते. ते सांगतायत रामाचा अपमान केला. उद्धव ठाकरे राम मंदिराच्या उदघाटनला आले नाहीत हा रामाचा अपमान? तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही आता तुमची तुतारी चांगली वाजवणार आहे. आमची सगळी शिवसेना सुप्रियाताईच्या मागे ठाम पणे उभी आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं.
2 कोणीतरी ऐरेगैरे गुजरातमधून येणार आणि आमच्या पराभवासाठी बारामती ठाण मांडून बसणार… चंद्रकांत पाटील म्हणतात आम्ही शरद पवार यांना संपवायचं आहे. आले किती गेले किती पण बारामतीमध्ये शरद पवार यांचा दरारा आहे. अजित पवार यांचं काल भाषण ऐकलं, माझं कामं कर नाहीतर बघून घेईल. अरे तुम्ही कायं बघणार 4 जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. तुमच्या धमक्यांना घाबरणारी जनता नाही. धमक्या देऊन निवडणूक लढवू नका, जनता तुमच्या धमक्याला भीक घालणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
रोज बघावं तेव्हा नरेंद्र मोदी, शाह महाराष्ट्रामध्ये आहेत. सगळा देश सोडला आणि महाराष्ट्रमध्ये येतं आहेत… त्यांना महाराष्ट्रची भीती वाटतेय. गेली 10 वर्ष पंतप्रधान नुसतं खोटं बोलतायत.. आम्ही विचार करतोय, नरेंद्र मोदी औरंगजेब सारखे का वागतात? तुम्ही स्वतः औरंगजेब आहात मोदी… त्याचा जन्म गुजरात मध्ये झाला होता.. त्यामुळं ते शिवराय यांच्या महाराष्ट्रवर धावून येतायत.. कोण चाल करून येतात त्यांचा मान आम्ही राखणार नाही, असं म्हणत संजय राऊतांनी नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे.