चंद्रकांतदादांचे आभार, अखेर त्यांच्या तोंडून खरं बाहेर आलं…; सुप्रिया सुळेंचं सासवडमध्ये भाषण

Supriya Sule on Chandrakant Patil BJP and Loksabha Election 2024 : पुण्यातील सासवडमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं. यावेळी भाजपवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

चंद्रकांतदादांचे आभार, अखेर त्यांच्या तोंडून खरं बाहेर आलं...; सुप्रिया सुळेंचं सासवडमध्ये भाषण
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 4:13 PM

पुणे जिल्ह्यातील सासवड या गावी महाविकास आघाडीची आज सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. शशिकांत शिंदे बाबतीत काय रडीचा डाव खेळताय. कुणालाही अटक केली तर रान पेटवू महाराष्ट्रमध्ये हा माझा शब्द आहे. त्यांनी का 50 टक्के महिलांना उमेदवारी नाही दिली? हा 80 वर्षचा नेता दिल्लीला अवघड जात आहे, चंद्रकांत दादांचे आभार, एकतरी नेता खरं बोललात. अखेर खरं बाहेर निघालं त्यांच्या तोंडातून त्यांना शरद पवारांना संपवायचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांचं स्थानिकांना आवाहन

आज सभेला उपस्थित राहिल्याबद्दल संजय राऊत साहेबांचे आभार मानते. व्यासपिठाच्या खाली कोण कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे ओळखू शकत नाही. इतके सगळे एक होऊन कामं करतायेत. तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला पाठवलं. आता माझं कामं बघून पुन्हा एकदा मला निवडून द्यावं, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.

400 कोटींचा निधी देण्याचं कामं उद्धव ठाकरे सरकार आणि माविआ सरकारने दिलाय. टॅक्स भरून सुविधा देत नाहीत, आम्ही आंदोलन करून थकलो. आता जा आम्ही टॅक्सचं भरत नाही. पुरंदरच्या एअरपोर्टला उशीर कुणामुळं झालाय? हे सगळ्यांना माहिती आहे. त्याला परवानगी देणारा दिल्लीत बसलेला आहे. आम्ही कुणी त्याठिकाणी जमिनी घेतल्या नाहीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवारांवर निशाणा

6 महिन्यापूर्वी आमचा घटस्फोट झालाय आणि अचानक काय झालंय. काय समजत नाही. अचानक माझ्यात काय बदल झालाय? त्यांचं भाषण कोण लिहून देतंय काय माहिती? ठिक आहे निवडणूक आहे. त्यामुळं टीका होत राहते. पण मी मेरिटवर मतं मागते. पत्रकार मला रोज प्रश्न विचारतात, मी त्यांना आता एकच उत्तर देते. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी…, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

“रडणार नाही, तर लढणार”

10 वर्षात महागाई बेरोजगारी शिगेला पोहचली आहे. त्यामुळं बदल करावा लागणार आहे. शारदाबाई पवाराची मी नात आहे. मला रडायला नाही लढायला नाही शिकवलं आहे. एवढं सगळं असताना तुमचा चेहरा एवढा फ्रेश कसा. कारण पहिली गर्दी नसायची. पण आता आमच्या समोरची गर्दी वाढलेली दिसतीय. मलिदावाली लोकं गेली आणि सामान्यांची गर्दी वाढली आहे. भ्रष्टाचारपेक्षा पुत्रीप्रेम चांगलं!, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.