Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवतारेंची शरद पवार- अजित पवारांवर जहरी टीका; म्हणाले, एक राक्षस तर दुसरा…

Vijay Shivtare on Sharad Pawar and Ajit Pawar : शरद पवार- अजित पवार म्हणजे एक राक्षस तर दुसरा ब्रम्हराक्षस...; शिवतारेंच्या विधानाने चर्चांना उधाण. शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी माध्यमांशी बोलताना काय म्हटलं? बारामतीतून लोकसभा निवडणूक लढणार का? वाचा सविस्तर...

शिवतारेंची शरद पवार- अजित पवारांवर जहरी टीका; म्हणाले, एक राक्षस तर दुसरा...
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 1:46 PM

बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी विजय शिवतारे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी ही बैठक बोलावली होती. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिवसैनिक, पदाधिकारी यांच्यासह सरपंच आणि उपसरपंच देखील बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर शिवतारे यांनी जहरी टीका केली. पवारांनी दहशतवाद निर्माण केला, असा जोरदार शाब्दिक हल्ला विजय शिवतारे यांनी केला आहे.

तो फक्त गैरसमज- शिवतारे

राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवला जात आहे की, मला फक्त अजित पवार यांना हरवायचं आहे. मी शरद पवार यांचा माणूस असल्याचं सांगितलं जातं आहे. पण असा आरोप करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, असा नालायक पणा मी कधीच करणार नाही. मी लोकसभा निवडणूक लढतोय ते जिंकण्यासाठीच… ही लढाई पवारांचा विरोधात आहे. ही लढाई खूप मोठी आहे, असं विजय शिवतारे म्हणाले.

तटकरेंच्या टीकेला उत्तर

सुनील तटकरे म्हणतात की, विजय शिवतारेंची स्क्रिप्ट कोण लिहून देत त्याला मी सांगतो आता… अजित पवार यांनी गोळीबार केला शेतकऱ्यांना गोळ्या घातक्या तेव्हा तुम्ही गप्प राहिलात? शरद पवार आणि अजित पवार यांना देखील माहितीय विजय शिवतारे कोण आहेत. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे. हे लोक ग्रामीण टेरेरिझम ग्रामीण दहशतवाद या पवारांनी केला आहे, असा घणाघात विजय शिवतारे यांनी केला आहे.

माझ्या माणसानं त्रास दिला जात आहे. अजित पवारांनी खूप पाप केली आहेत. अख्ख्या राज्याला हा ग्रामीण दहशतवाद हा शब्द माहिती पडेल. 70 वर्षात यांनी केलं काय फक्त घुसले यांनी फक्त घुसखोरी केली आहे, असं विजय शिवतारे म्हणालेत.

पवारांवर घणाघात

आधी देशात ईस्ट इंडिया कंपनी होती, ती गेली. आता पवारांची कंपनी आली. शरद पवार आणि अजित पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रम्हराक्षस आहे. दोघांचा मला खात्मा करायचा आहे. यांनी लोकांवर प्रचंड अन्याय केले आहेत. कपट कारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलं. आता यांना बाजार दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात शिवतारेंनी पवारांवर टीका केली आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.