देशाच्या इतिहासात असा एक माणूस नाही जो माझ्याएवढं…; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar on his Career and Loksabha Election 2024 : शरद पवार यांनी शिरूरमध्ये बोलताना एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या विधानाची चर्चा होतेय. भारतीय राजकारणाच्या इतिहासावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

देशाच्या इतिहासात असा एक माणूस नाही जो माझ्याएवढं...; शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 8:15 PM

सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी मतदारसंघासाठी निधी आणला नसल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. याला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. आज काही लोक सांगतात, लोकसभेत जायचं नुसतं जाऊन काय उपयोग? निधी आणावा लागतो… आज मला विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी जाऊन 56 वर्षे झाली. हिंदुस्थानच्या राजकारणात असा एक ही माणूस नाही की, ज्याने या सभागृहात सलग 56 वर्षे पूर्ण केली असतील. चांगलं काम करणारा जागृक सभासद असेल तर निधी मिळतो. ती जागृकता अमोल कोल्हे यांच्यामध्ये आहे, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांकडून कौतुक

लोकसभेत गेल्यावर सत्ता आवश्यकच असते, असं नाही. सत्ता नसताना ही काम करता येत फक्त जागरूक सभासद म्हणून तुमचा लौकीक झाला पाहिजे. पुणे जिल्ह्यातून ग्रामीण भागातून दोन खासदार आहेत. ज्यांचं नाव देशातील लोकसभेत घेतलं जातं. एक माझी मुलगी सुप्रिया सुळे आणि दुसरे डॉ. अमोल कोल्हे…, असं म्हणत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

नुसतं शेती एके शेती करून चालणार नाही. रांजणगावला जी जमिन दिसतेय. ती जिरायत असताना मला अस्वस्थ करायची. नंतर तिथे येऊन बैठक घेतली एमआयडीसी केली. स्थानिक लोकांनी सहकार्य केल्यानंतर काय होत याच उत्तम उदाहरण शिरूर रांजणगाव औद्योगिक वसाहत आहे. अनेक कामे होऊ शकली ती तुमच्या सहकार्यामुळे आणि पाठींब्यामुळे…, असंही शरद पवार म्हणाले.

पवारांकडून ते आश्वासन

सरकारमध्ये या तालुक्याला कमी संधी दिली, असं म्हटलं जातं. हे खरंय गेली अनेक वर्ष आंबेगावला वळसे पाटलांना मंत्रिपद दिलं गेलं. शिरूरला कमी संधी मिळाली, हे मी मान्य करतो. पण आता एक गोष्ट चांगली झाली चार पैकी तीन जणांनी आपला रस्ता बदलला. पण आता शिरूरला मंत्रिपदाची संधी मिळेल. अशोक पवारांच काम चांगलं त्यांना संधी मिळेल, असं म्हणत शरद पवारांची अशोक पवार यांच्या मंत्रिपदाबाबतची मोठी घोषणा केली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.