सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळेच राज्यात वाद वाढला; शरद पवार यांचा गंभीर आरोप
Sharad Pawar on Maharashtra Government : शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी छगन भुजबळांसोबत झालेल्या भेटीचा शरद पवारांनी उल्लेख केला. तेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पवारांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. वाचा सविस्तर...
आरक्षणासंदर्भात झालेल्या सर्व पक्षीय बैठकीला मी गेलो नाही. दोन कारणे होती. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी जरांगेचं उपोषण सुरू होतं. त्यांना भेटले. त्यांचा संवाद काय झाला माहीत नाही. त्यानंतर उपोषण सुटलं. त्यानंतर जरांगे पाटील यांची नवी मुंबईत एक संयुक्त कार्यक्रम पाहिला. याचा अर्थ काही तरी त्यांच्यात संवाद होता. तो आम्हाला माहित नव्हता. विरोधकांनी मत मांडावं असा त्यांचा आग्रह आहे. राज्यकर्ते हे, निर्णय द्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा. ही भूमिका संमजसपणाची नव्हती, शहाणपणाची नव्हती, असं शरद पवार म्हणाले. सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळेच राज्यात वाद वाढला, असा आरोपही पवारांनी केलाय.
आरक्षणावर पवार काय म्हणाले?
ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरू होतं. तिथे राज्य सरकारचे मंत्री गेले. त्यांचं काय बोलणं झालं माहीत नव्हतं. त्यांच्यातील सुसंवाद माहीत नव्हता. त्यामुळे मिटिंगला जाण्याचं कारण एकच होतं की, सरकार जरांगे आणि ओबीसीं नेत्यांशी बोलत आहेत. त्यानंतर नेते काही विधानं करत आहेत. पण संवाद काय झाला आणि प्रस्ताव काय होता हे पब्लिकला आणि आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे जरांगे यांना सरकारने काय आश्वासन दिलं याचं वास्तव चित्र आपल्याकडे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जी कमिटमेंट केली त्याची माहिती येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांनी आम्हाला माहिती दिली तरच आम्ही जाऊ शकतो असं ठरवलं. त्यांनी ४०-५० लोकांना बोलावलं आणि चर्चा केली. तिथे मत मांडावं असं योग्य वाटलं नाही, असं शरद पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.
भुजबळांसोबत काय चर्चा?
छगन भुजबळ म्हणाले, झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल. नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील. स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधाने केली ती वाद वाढायला मदत करणारी होती. मार्ग काढायाचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्यकर्त्यांनी कितपत ही भूमिका घेतली माहीत नाही. तसं दिसलं नाही. या सर्व गोष्टीत जे कोणी सरकारच्या वतीने चर्चेला मुख्यमंत्री होते, भुजबळ, फडणवीस, अजित पवार होते. इतर काही लोकं. या लोकांनी काय निर्णय घेतला बैठकीत आम्हाला माहीत नव्हते. आम्हाला बाजूला ठेवून यांनी निर्णय घेतले, असं पवारांनी म्हटलं.
आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांची गरज आहे. असं मार्गदर्शन भुजबळांनी केलं. मी सांगितलं प्रश्न सोडवायचे असेल तर जरांगेंना काय कमिटमेंट दिल्या, कोणत्या गोष्टीची पूर्तता केली आणि करणार आहात जरांगेंना सांगा. ओबीसीना त्यांच्या हिताची काही कमिटमेंट केली ती माहिती आम्हाला द्या. त्यातून काही चांगलं निघत असेल तर तुमची धोरणं दुरुस्त करून, बाकीच्या गोष्टी विसरून पुढे जाऊ. आज शांततेची गरज आहे, असं विधानही शरद पवारांनी केलंय.