नुकतंच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले. तर महाविकास आघाडीच्या मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांचा विजय झाला. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव का झाला? यावर शरद पवार यांनी भाष्य केलंय. जयंत पाटील यांच्यासोबत एकत्रित निर्णय झाला नव्हता. एकत्रित म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने उमेदवार ठरवण्याचा निर्णय झाला नव्हता. माझ्यापक्षाची १२ मते होती. आम्हाला शेकापला पाठिंबा द्यावा असं वाटलं, असं शरद पवार म्हणाले.
जयंत पाटील यांना पाठिंबा दिला. त्याला कारण होतं. लोकसभेच्या निवडणुकीत तिघे एकत्र लढलो. ती लढत असताना सीपीआय, सीपीएम, शेकाप येतात. त्यांना आम्हाला काही जागा मागितल्या. ते देण्याच्या स्थितीत नव्हतो. तेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि मी एकत्र बसलो. तेव्हा त्यांना सांगितलं की, डाव्यांना आता काही देऊ शकत नाही. पण विधान परिषद आणि विधानसभेत त्यांना मदत करू. सर्वांनी मान्य केलं. तिघे एकत्र लढलो. लोकसभेत यश मिळालं. मनात होतं की संधी आली तर जागांचा विचार करावा, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
काँग्रेसची मते जास्त होती. त्यांनी उमेदवार दिले. शिवसेनेकडे थोडी जास्त होती, पण पुरेशी नव्हती. त्यांनी उमेदवार झाली. त्यांची स्ट्रॅटेजी आहे. पण त्यात मतभिन्नता होती. काँग्रेसकडे ३७, आमच्याकडे १२ आणि शिवसेनेकडे १६ होती. काँग्रेसकडे जेवढी मते होती. त्यांनी दोन आणि एक नंबरचं मत कुणालाही देऊ नये असं मत होतं. निवडून येण्यासाठी सर्व मते तुम्ही घ्या, असं पवार म्हणाले.
दोन नंबरची मते ५० टक्के मते शेकाप आणि ठाकरे गटाला द्या. एक नंबरची मते अधिक होती आणि ही मते सर्व ट्रान्सफर होतील. तेवढी मते दोन नंबरला जातील. दोन नंबरच्यांनी पहिलं मत ठाकरेंना द्यावं. आणि ठाकरेच्या दोन नंबरने पहिलं मत शेकापला द्यायला हवं होतं. माझं गणित होतं. आमचे निवडून आले असते. हे गणित मान्य झालं नाही. त्यामुळे शेकापचे पाटील पडले. कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजीमुळे पडले, असं म्हणत पवारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पराभवाचं कारण सांगितलं.