जादूगार म्हणून माझी ओळख…; भुजबळांसोबतच्या भेटीनंतर शरद पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा
Sharad Pawar Shared Old Memories : शरद पवार यांचा आज पुणे पत्रकार संघात वार्तालाप सुरु आहे. सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ भेटीवर शरद पवार काय बोलणार, याकडे लक्ष आहे. पण सध्या शरद पवार जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. शरद पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...
पुणे पत्रकार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माध्यमांशी संवाद साधत आहेत. दोन दिवसाआधी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर शरद पवार पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधत आहेत. यावेळी शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं. आम्ही इथे कॉलेजात एक जादूगार राहत होते. त्यांची भेट घ्यायचो. काही जादू शिकता येतो का ते पाहायचो. चेष्टेचा भाग सोडून द्या. तुम्हाला भेटता आलो याचा आनंद आहे, असं शरद पवार म्हणाले.
माझा पत्रकारितेशी संबंध आला. तेव्हा सकाळमध्ये ट्रेनी पत्रकार हवे होते अशी जाहिरात आली. मी अर्ज केला. माझी मुलाखत साठे यांनी घेतली. माझी निवड केली. मला काही दिवस तिथे काम करण्याची संधी मिळाली. सकाळची एक शिस्त होती. त्यांच्या बातम्या पाहिल्यावर मीही अस्वस्थ होत होतो. बातमी लहान असली तरी ती आपल्या गावची छापून येते म्हणून दिली पाहिजे, असं नाना परूळेकर म्हणाले. भीमा नदीला पूर आला. लोकांनी कलिंगडची लागवड केली आणि पीक वाहून गेले. ही बातमी मला अस्वस्थ करायची. पण वरिष्ठांना वाटायचं की शेवटच्या लोकांना न्याय दिला पाहिजे. म्हणून ते बातमी छापायचे. त्यानंतर मी आणि माझ्या काही मित्रांनी एक पेपर काढला. त्याचं नाव होतं नेता. नंतर मी हे फिल्ड सोडलं आणि पक्षाचं काम सुरू केलं, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
मुंबईतील काँग्रेसभवनमध्ये राहत होतो. त्यावेळी काही लोकांशी मैत्री झाली. त्यात बाळासाहेब ठाकरे आणि व्हीके देसाई होते. आणखी एक मित्र होते. आम्हा चौघांचा ग्रुप होता. त्यावेळी मला वाटायचं वर्तमानपत्र काढू असं वाटलं. बाळासाहेब ठाकरे आणि मी प्रत्येकाने पाच पाच हजार काढून २० हजार खर्च करून राजनीती नावाचं पत्रक काढलं. टाइम्सच्या अंकासारखं आम्ही तो अंक काढला, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
मला तुमची काळजी वाटते. दिल्लीत थंडीत प्रचंड थंडी. उन्हाळ्यात प्रचंड ऊन. काही घडलं मी दिल्लीत गेलो तर माझ्याघरासमोर ३० ते ४० कॅमेरे असतात. मला वाईट वाटतं. ते तासन् तास उभे असतात. ओझं डोक्यावर घेऊन आमच्या मागे उभं असतात. ते चित्र कसं बदलायचं हे कळत नाही. पण दक्षिणेत वेगळं चित्र आहे. तिथल्या पत्रकारांची संख्या जास्त असते. ते यातना सहन करून बातमी मिळवण्याचं काम करत असतात, असं शरद पवार यावेळी म्हणाले.