पुणे: शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून 20 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. गावच्या नागरीकांच्या आरोग्यासाठी गावानेच पुढाकार घेतल्याने पुणे जिल्ह्यात प्रथमच असे प्राथमिक उपचार देणारे कोविड सेंटर सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. नाशिकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे हे गणेगाव खालसा येथील तांबे कुटूंबातील पुत्र आहेत. त्यांनी गावात छोटेसे कोविड सेंटर सुरु करण्याबाबत सूचना केली होती.गणेगाव खालसा ग्रामस्थांनी ती अंमलात आणली. (Pune Shirur Ganegaon Khalasa Village started covid care centre on suggestion of Nashik Deputy Police Commissioner Amol Tambe)
पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी राज्यात सुरू असणारा कोरोनाचा प्रादुर्भावामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी छोटेसे कोविड सेंटर सुरू करण्याचे सुचविले होते. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमीक शाळेत 20 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बेड व ऑक्सिजन मिळत नसल्याने मोठ मोठे दवाखाने रूग्णांनी गच्च भरले आहेत. गावतल्या नागरिकांची चाचणी होऊन अगदी तातडीने बाधित रूग्णांवर उपचार झाले तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी नागरिकांनी कोणताही प्रकारचा हलगर्जीपणा न करता चाचणी करून घेणे गरजेचे आहे. बांधितावर तातडीने उपचार झाल्यावर कमी कालावधीत कोरोना मु्क्ती मिळू शकते, असे आवाहन तांबे यांनी भ्रमणध्वनी वरून ग्रामस्थांना यावेळी केले.
दरम्यान, या कोविड सेंटरचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप येळे व वैद्यकीय अधिकारी महेश सातव यांच्या हस्ते करण्यात आले. गावच्या नागरिकांना या महामारी पासून वाचविण्यासाठी नाशिकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्या सूचनेनंतर गणेगाव खालसा गावातच सुरू केलेले कोविड सेंटर हा उपक्रम कौतुकास्पद आहे. परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी या बाबत दखल घेतल गावातल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन मानसिंग पाचुंदकर यांनी केले आहे. यावेळी उपसरपंच आबासाहेब बांगर उपस्थित होते.
शरद पवारांच्या आवाहनाला यश, ऑक्सिजन निर्मितीचा पहिला पायलट प्रोजेक्ट ‘हा’ कारखाना सुरु करणारhttps://t.co/pfud9bwj6V#SharadPawar | #OxygenShortage | #OxygenShortage | #Maharashtra | #AbhijeetPatil
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 25, 2021
संबंधित बातम्या:
‘अहो दादा, असं मोघलांसारखं काय बोलता’, मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात
कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता एक चांगला निर्णय येईल; अमोल मिटकरी आशावादी
(Pune Shirur Ganegaon Khalasa Village started covid care centre on suggestion of Nashik Deputy Police Commissioner Amol Tambe)