पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेकडून आदेश जारी

आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने (RBI) तात्काळ रद्द केला आहे. (Pune Shivajirao Bhosale Sahakari Bank License Cancelled)

पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेकडून आदेश जारी
RBI
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 7:35 AM

पुणे : आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने (RBI) तात्काळ रद्द केला आहे. ही बँक लिक्विडेशनमध्ये काढल्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने जाहीर केला आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने पैसे थकवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सहकार विभागाने केलेल्या शिफारसीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. (Pune Shivajirao Bhosale Sahakari Bank License Cancelled By RBI)

परवाना रद्द करण्याची कारणं काय?

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत. त्यामुळे कायद्यानुसार ही बँक विविध निकषांची पूर्तता करु शकत नाही. यामुळेच बँक आपल्या ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नाही. या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने बँकेला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देता येत नाही. आर्थिक अनियमिततेसह इतर कारणांमुळे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे.

बँक लिक्विडेशनमध्ये काढण्याची प्रक्रिया तातडीने सुरु

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. सध्या ही बँक लिक्विडेशनमध्ये काढण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली आहे. विमा महामंडळाच्या कक्षेत येणाऱ्या बँकेच्या 98 टक्के ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे, असंही आरबीआयने म्हटलं आहे.

ठेवीदारांचं पुढे काय?

या कारवाईमुळे बँकेतील 98 टक्के ठेवीदारांना त्यांची व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी ओळखपत्रांसह (केवायसी प्रक्रियेनुसार आवश्यक) आपला दावा सादर करावा, असे सांगितले जात आहे.  (Pune Shivajirao Bhosale Sahakari Bank License Cancelled By RBI)

संबंधित बातम्या : 

Gold Price Today : सोने महिनाभरात 2000 रुपयांनी महागले, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नगर, कोणत्या शहरात दर किती?

1 जूनपासून 6 नियम बदलणार, सामान्य माणसाच्या खिशावर काय परिणाम?

रुग्णालये अन् नर्सिंग होमसाठी सरकारची मोठी घोषणा, 2 कोटीपर्यंत कर्ज, व्याजदर अत्यंत कमी

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.