दादा तुमच्यात धाडस असेल तर…; दौंडच्या सभेतून रोहित पवारांचं अजित पवारांना थेट आव्हान

Rohit Pawar on Ajit Pawar in Shupriya Sule Daund Daund Varvand Sabha : दौंडच्या सभेतून रोहित पवारांचं अजित पवारांना थेट आव्हान... म्हणाले, अजितदादा तुमच्यात जर धाडस असेल तर... काकांचं पुतण्याला ओपन चॅलेंज. रोहित पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

दादा तुमच्यात धाडस असेल तर...; दौंडच्या सभेतून रोहित पवारांचं अजित पवारांना थेट आव्हान
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 4:26 PM

बारामती लोकसभा मतदारसंघाता प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दौंड तालुक्यात महाविकास आघाडीची आज सभा होत आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये जाहीर सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची जाहीर सभा होतेय. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, रोहित पवार, भूषणसिंह होळकर हे नेते या सभेला उपस्थित आहेत. या सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिकांना संबोधित केलं. तेव्हा बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

अजित पवारांना आव्हान

आमचं कुटुंब फोडलं. आमचा एक नेता पळून नेला आणि इथं उभं केलं. त्यांना वाटत होतं की पवारसाहेब या मतदादरसंघात अडकून पडतील. पण शरद पवारसाहेबांनी राज्यात 54 सभा घेतल्या. अजितदादा तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्या यांना तुमच्या प्रचारासाठी बोलवा. महाराष्ट्र कधीच गुडघ्यावर येत नाही. आमचा हा वस्ताद तुम्हाला गुडघ्यावर आणेल. तुम्हाला येऊन धमक्या देत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना आव्हान दिलं आहे.

अजित पवार जर तुम्ही पवारसाहेबांना वडील म्हणत होतात. मग लोकांना वाटत आहे की तुम्ही वडिलांचे झाले नाहीत, तर जनतेचे काय होणार? ऊसाची चिंता करू नका. एकाचही ऊस मी शिल्लक ठेवणार नाही… उद्या पवार साहेबांचा पालकमंत्री असणार आहे. पवार साहेब तुमच्या पाठीशी भक्कपणे उभे राहतील. तुम्ही अडचणीत होतात म्हणून सोडलं. मलाही एखादं पद भेटलं असतं. कारवाई झाली नसती पण गेलो नाही. आपण सर्व साहेबांसोबत आहोत, असं रोहित पवार म्हणाले.

“शरद पवारसाहेब विरुद्ध भाजप लढाई”

सुप्रियाताईंना तिसऱ्यांदा खासदार करायचं आहे. ही निवडणूक आपण सर्व भाजपच्या विरोधात लढत आहोत. ही लढाई शरद पवारसाहेब विरुद्ध भाजप आहे. सामान्य नागरिक विरूद्ध भाजप आहे. जनतेसाठी या लोकांनी काय केलं? सामन्य लोकांच्या हितासाठी हे सत्तेत गेले नाहीत. स्वतःचा विकास करण्यासाठी गेले आहेत, असंही रोहित पवार म्हणालेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.