बस आणि पिकअप चालकाचा वाद प्रवाशाच्या जीवावर, ट्रक धडकल्याने बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

एमक्युअर कंपनीच्या कामगारांना नेणारी बस, ट्रक आणि केळी वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीचा विचित्र अपघात झाला. (Pune Highway Bus Accident)

बस आणि पिकअप चालकाचा वाद प्रवाशाच्या जीवावर, ट्रक धडकल्याने बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू
बस, ट्रक आणि पिकअपचा तिहेरी अपघात
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 8:43 AM

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर एमक्युअर कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणारी बस, ट्रक आणि पिकअप गाडी अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात बसमधील एका कामगाराला प्राण गमवावे लागले, तर तीन प्रवासी जखमी झाले आहेत. बस आणि पिकअप चालकात महामार्गावर वाद होत असताना ट्रकने मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे बसमधून खाली पडून प्रवाशाचा मृत्यू झाला. (Pune Solapur National Highway Bus Pick Up Truck Multiple Vehicle Accident kills Bus Passenger)

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मस्तानी तलावाच्या विरुद्ध बाजूला हा अपघात घडला. एमक्युअर कंपनीच्या कामगारांना नेणारी बस, ट्रक आणि केळी वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीचा संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला.

बस आणि पिकअप चालकात बाचाबाची

पुणे-सोलापूर महामार्गावर कंपनी कामगारांना घेऊन जाणारी बस आणि केळी वाहतूक करणारी पिकअप यांच्या चालकात बाचाबाची झाली होती. दोन्ही वाहने महामार्गावर उभी होती. यावेळी पाठमागून भरधाव येणारा ट्रकने या वाहनांचा धडक दिली. या अपघातात बसमधील कंपनी कामगार हा बसमधून खाली पडला. जबर जखमी झाल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

ट्रक बसला धडकल्याने प्रवासी उडाला

योगेश मुसमाडे असे या अपघात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ओमप्रकाश यादव (रा. हडपसर), हिमेश चव्हाण (रा. पुणे) आणि बस चालक मनोहर बंडगर अशी या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे असल्याचं उपस्थितांनी सांगितलं. यापैकी दोन जण गंभीर जखमी आहेत.

अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान

पिकअप गाडी नंबर (एम एच 13 आर 7497), भारत बेंझ ट्रॅव्हल्स नं. (एम एच 14 GU 1715)आणि ट्रक नंबर (MH 12 MV5597) या तीन गाड्यांचा हा अपघात झालेला आहे. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पिकअपमधील केळीचे कॅरेट महामार्गावर पडले होते. पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे आणि पाटस पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली.

संबंधित बातम्या :

Video | स्कुटीचालक मध्ये आला अन् सगळं संपलं, भीषण अपघातामुळे नेटकरी हादरले, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

VIDEO | ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकली, एक्स्प्रेस वेवर अपघात, ट्रकचालक ठार

(Pune Solapur National Highway Bus Pick Up Truck Multiple Vehicle Accident kills Bus Passenger)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.