काल उमेदवारी जाहीर, आज सुनेत्रा पवार यांचा मतदारसंघात दौरा; म्हणाल्या, घड्याळाला मतदान म्हणजे…

Sunetra Pawar at Mulshi Baramati Loksabha Election 2024 : सुनेत्रा पवार मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर; स्थानिकांशी संवाद साधताना म्हणाल्या... सुनेत्रा पवार यांची लोकसभेच्या बारामतीच्या उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर सुनेत्री पवार मतदारसंघाचा दौरा करत आहेत. वाचा सविस्तर...

काल उमेदवारी जाहीर, आज सुनेत्रा पवार यांचा मतदारसंघात दौरा; म्हणाल्या, घड्याळाला मतदान म्हणजे...
unetra Pawar
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 2:03 PM

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. अशात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यानंतर सुनेत्रा पवार आज मतदारसंघात गावभेट दौरा करत आहेत. सुनेत्रा पवार सलग दुसऱ्या दिवशी बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज मुळशीमधील बावधन परिसरातील विविध सोसायट्यांना त्या भेटी देत आहेत.

सुनेत्रा पवार यांचा मतदारसंघात दौरा

सुनेत्रा पवार सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. दौऱ्यादरम्यान नागरीकांच्या भेटी घेत त्या घेत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत आहेत. सुनेत्रा पवार त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. यावेळी विकासाशी बांधिलकी जपणाऱ्या अजितदादांच्या विचाराचा खासदार व्हावा. यासाठी घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन त्या ठिकठिकाणी करत आहेत. कालच बारामती लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर आज त्या मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत.

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्व भूमीवर गेल्या 20-25 दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघात गावाभेट दौरा करत आहे. कालच महायुतीकडून मला उमेदवारी देऊन जवाबदारी दिली आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेल. उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आभार. पक्षाच्या आणि मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असं सुनेत्रा पवार यावेळी बोलताना म्हणाल्या.

“घड्याळाला मतदान म्हणजे…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरात विकास पुरुष म्हणलं जातं. याचं विकासाचा धागा धरून अजित पवारांनी याचा पाईक होण्याचं ठरवलं आहे. आपलं चिन्ह घड्याळ आहे. घड्याळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान… त्यामुळे यंदा घड्याळाला मतदान करा…, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी मतदारांना केलं आहे.

पाण्यासह अनेक अडचणी नागरिकांनी आत्ता सांगितल्या आहेत. त्या जितक्या लवकर सोडवता येतील. तितक्या लवकर सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपण मतदान करणं गरजेचं आहे. आपला विश्वास मी सार्थ ठरवेन, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.