Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांची ‘ही’ बाजू कुणाला माहिती नाही, घरी असले की…; सुनेत्रा पवारांनी सांगितला स्वभावातला गुण

Sunetra Pawar on Ajit Pawar Nature : अजित पवारांचं आवडतं गाणं कोणतं?; सुनेत्रा पवार म्हणाल्या... राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वभावातील गुणावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भाष्य केलं. तसंच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्या बोलत्या झाल्या.

अजित पवारांची 'ही' बाजू कुणाला माहिती नाही, घरी असले की...; सुनेत्रा पवारांनी सांगितला स्वभावातला गुण
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 8:16 AM

अजित पवार म्हटलं की त्यांचा कडक शिस्तीचा स्वभाव डोळ्यासमोर येतो. पण अजित पवार यांच्या स्वभावात मिश्किलपणा देखील आहे. त्यांच्या स्वभातील गुणांवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रकाश टाकला. बारामती लोकसभा मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांना अजितदादा घरी कसे असतात? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा खरं म्हणजे अजित पवारांच्या स्वभावाची ही बाजू कुणाला माहिती नाहीये. ते घरी असले की त्यांचा मिश्किल स्वभाव समोर येतो. ते प्रचंड हजरजबाबी आहेत. कुटुंबातील लोक एकत्र असले की ते जोक करतात. आणि वातावरण हलकं फुलकं होऊन जातं, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. तसंच ‘हमें तुम से प्यार कितना ये हम नहीं जानते’ हे गाणं त्यांना खूप आवडतं, असंही त्यांनी सांगितलं.

स्थानिकांशी संवाद

सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार आहेत. त्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्थानिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी अजितदादांची बायको अशी माझी ओळख ठीक आहे. पण माझं कर्तृत्व कायं? हे तुम्हा लोकांना माहिती असायला हवं.. असं म्हणतं सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडला. बारामती हायटेक टेक्स्टटाईल पार्क,  विद्या प्रतिष्ठान, एनजीओ अशा विविध संस्थांमार्फत केलेल्या समाजकारणाशी निगडित केलेली कामं सुनेत्रा पवार यांनी लोकांसमोर मांडली.

अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंवर निशाणा

भाव-भावनांचा खेळ चालू आहे, मनस्थिती सगळ्यांची वेगळ्या प्रकारची आहे. भावनांचा जरी प्रश्न असला तरी देवही अजून सगळ्या समस्या सोडवू शकलेला नाही. पण आता मनामध्ये जो गोंधळ असेल तो बाजूला ठेवला पाहिजे. कारण गेल्या पंधरा वर्षात किती प्रश्न सुटले? गेल्या पंधरा वर्षात तुमच्या आमदार, खासदार यांनी केलेल्या कामांचा लेखा जोखा तुमच्या समोर आह, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांच्या गेल्या पंधरा वर्षातील कामकाजावर बोटं ठेवलं.

“सांगा दादाचं चुकलं काय?”

परिस्थिती सांगून येतं नसते. घटना अचानक घडत असतात. अजित पवारांनी वेगळा निर्णय घेण्याला, त्यामागे अनेक कारणं आहेत. जेव्हा एखाद्या गोष्टीचा कडेलोट होतो. तेव्हाच माणसं वेगळा निर्णय घेतात. संविधानामध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्यचा आणि व्यक्ती विचाराचा अधिकार आहे. जर हेच व्यक्तिस्वातंत्र्य अजित पवारांनी वापरलं असेल. व्यक्ती विचारातून वेगळा विचार केला असेल. तर त्यात काय चुकलं?, असं म्हणत अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयावर सुनेत्रा पवार व्यक्त झाल्या.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.