अजितदादांचे मी आभार मानते की…; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

NCP Leader Supriya Sule on Ajit Pawar Devendra Fadnavis : अजित पवार- सुप्रिया सुळे एकाच मंचावर; दोघांमध्ये काय चर्चा?, सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट सांगितलं.... अजित पवारांचे आभारही मानले. पुण्यातील कार्यक्रमानंतर खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

अजितदादांचे मी आभार मानते की...; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 11:48 AM

योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 10 मार्च 2024 : पुण्यात आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. पुणे महानगरपालिकेच्या मल्टि सपेशालीटी हिलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळ्याला अजित पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही प्रमुख उपस्थिती होती. 380 कोटीचं उभं हॉस्पिटल राहतंय. या हॉस्पिटलचं भूमिपूजन आज पार पडलं. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे आभार मानलेत. आमच्या पक्षात सत्तेचं विकेंद्रीकरण आहे. शरद पवार जयंत पाटील यांनी दादांच्या कामात ढवळढवळ केली नाही. हे आज अजितदादांच्या बोलण्याने स्पष्ट झालं. अजितदादांचे मी आभार मानते की, त्यांनी हे आज स्पष्ट केलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंकडून अजितदादांचे आभार

ज्यांनी भाषण केलं त्यांनाच विचारावे लागेल. पुणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि हीच तर पवार साहेबांची खासियत आहे. या भागातील निर्णय प्रक्रियेत पवार साहेब आणि जयंत पाटील यांनी कधी ही ढवळाढवळ केली नाही. हे दादांनी आज स्पष्ट केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांना किती फ्री हॅण्ड मिळाला होता, हे स्पष्ट झालं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार-सुप्रिया सुळे यांच्यात काय बोलणं झालं?

अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर पाहायला मिळाले. यावेळी दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. मला त्यांच्याशी बोलण्याची संधीच मिळाली नाही, आले पण उशिरा आणि गेले लवकर… त्यांना काही गडबड असेल ते बिझी लोकं आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या…

आजच्या कार्यक्रमाचे श्रेय कुणाचेही नाही. आरोग्याच्या कामाचं काय श्रेय घ्यायचं? माझी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल महाविकास आघाडीचे आभार व्यक्त करते. जागा वाटपाचा मला माहिती नाही. वरिष्ठ लवकर ठरवतील. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांच्या काँग्रेसवरील टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. 10 वर्ष ट्रेलरला लागतो का? आणि पिक्चर फक्त 5 वर्ष…, म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.