Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना गर्भित इशारा; म्हणाल्या, माझे वडील फार…

Supriya Sule on Sharad Pawar and Opposition Party : आम्ही कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सगळे लोक आता त्यांच्या सोबत आहेत. घर फोडलं पक्ष फोडले. यातून त्यांना काय मिळालं?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सुप्रिया सुळे यांनी भाजपवर घणाघात केलाय. वाचा...

सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना गर्भित इशारा; म्हणाल्या, माझे वडील फार...
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 1:18 PM

अभिजित पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 21 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सुप्रिया सुळे आज मतदार संघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. मतदार संघातील अनेक ठिकाणी भेट देत सुप्रिया सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला आहे. माझे वडील फार कमी बोलतात. ते कुणाला सल्ला तर देतच नाहीत. आता माझ्या वडिलांच्या मागे त्यांची बदनामी करायला अदृश्य शक्ती लागली आहे. राजकारण जरूर करा पण असं करू नको. रोहित पावारला ईडीची नोटीस आली. आता त्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“तर मी 100 वेळा निलंबित व्हायला तयार”

मला तुम्ही 3 वेळा मतदान करून दिल्लीला जायची संधी दिली. मी तुमची लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीत जाते. राज्यातून 48 खासदार दिल्लीत जातात. 38 सत्तेत आहेत तर 10 विरोधात आहेत. 18 वर्षात पहिल्यादा माझं निलंबन झालं. कारण मी शेतकरी बांधवांच्या मालाला भाव मिळावा ही मागणी केली. मी काही नियम मोडले नाहीत. कुठलीही घोषणाबाजी केली नाही. तरी मला निलंबित केलं. कामासाठी, लोकांसाठी आवाज उठवला आणि निलंबन केलं तर मी 100 वेळा निलंबित व्हायला तयार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुळे यांच्याकडून गडकरींचे आभार

राज्यातले प्रश्न आम्ही संसदेत मांडतो. आज लोकशाही नाही तर संसदेत दडपशाही सुरू आहे. त्यांचे 38 खासदार भीतीपोटी काहीच बोलत नाहीत. नितीन गडकरी साहेबांचे आभार मानते. कारण त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघात खूप कामे केली आहेत. आज 6 वंदे भारत रेल्वे जातात त्याचा उपयोग माझ्या मतदार संघाला शून्य फायदा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंचा भाजपला थेट सवाल

पुण्यात 5 वर्ष भाजपची सत्ता होती. 2 वर्ष झाली आपल्याला नगरसेवक नाहीये हे दुर्दैव आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे. मग आमचा काय विकास झाला आहे? स्मार्ट सिटी फक्त सांगितली गेली. प त्यामुळे तुमच्या-आमच्या आयुष्यात काय बदल झाला?, असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.