पुण्यातील नऱ्हेगावात भीषण अपघात, टँकरची टेम्पो, ट्रॅव्हलरला धडक, दोघांचा मृत्यू, 13 जण जखमी

मुंबई-बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नऱ्हेगावातील सेल्फी पॉईंटजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. इथेनॉल वाहून नेणाऱ्या टँकरने टेम्पो ट्रँव्हलरला जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

पुण्यातील नऱ्हेगावात भीषण अपघात, टँकरची टेम्पो, ट्रॅव्हलरला धडक, दोघांचा मृत्यू, 13 जण जखमी
Accident
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 12:29 PM

पुणे : मुंबई-बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नऱ्हेगावातील सेल्फी पॉईंटजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. इथेनॉल वाहून नेणाऱ्या टँकरने टेम्पो ट्रँव्हलरला जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

अपघात ग्रस्त गाडी थेट महामार्गावरील पुलावरुन उडून खाली सर्विस रोडवर येऊन पडली होती. एवढा हा भीषण हा अपघात होता. गुरुवारीही इथे अपघात झाला होता.

या रस्त्यावर आजवर 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

या ब्लँक स्पॉटवर आजवर पन्नासच्यावर बळी गेलेत. तरीही हायवे अँथॉरिटी अधिकारी या तीव्र उतारावर स्पीड ब्रेकर बसवत नाहीयेत. त्यामुळेच इथे वारंवार अपघात होत असल्याचे पोलिसांचं आणि स्थानिकांचं म्हणणं आहे.

नवले पुलावर विचित्र अपघात

गुरुवारी (21 ऑक्टोबर) मुंबई-बंगळुरु महामार्गावर नऱ्हे गावाच्या हद्दीत भूमकर पूल ते नवले पुलादरम्यान संध्याकाळी पाचच्या सुमारास पिकअप टेम्पोला कंटेनरने धडक देऊन पिकअप टेम्पोने शेजरुन जाणाऱ्या दोन बुलेट, अॅक्टिवा गाड्यांना पाठीमागू धडक देऊन पलटी झाला. या अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या महिलेचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच चार जण जखमी झाले आहेत.

तर कात्रज नवीन बोगद्यकडून आलेला एक कंटेनर पुढे चाललेल्या पिकअप टेम्पोला धडक देऊन या अपघातामुळे संपुर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पिकअप टेम्पोमध्ये बांधकाम व्यवसायात वापरण्यात येणारे साहित्य होते .साहित्य संपूर्ण रस्त्यावर अस्तव्यस्त तर पुढे वाहतूक कोंडी झाली असता बघ्याची मोठी गर्दी झाली होती .

साताऱ्याच्या दिशेकडून मुंबई दिशेकडे निघालेल्या एका कंटेनरने पिकअप वाहनाला धडक दिली. त्यामुळे पिकअप वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन दुचाकींना त्याची धडक बसली. कंटेनरन पिकअपला धडक दिल्यानंतर न थांबता पुढील दोन-तीन वाहनांना धडकला.

संबंधित बातम्या :

मुंबई नाशिक हायवेवर भीषण अपघात, आयशरवर धडकून पिकअप गाडीचा चक्काचूर

चंद्रपुरात थरारक अपघात, आठवडी बाजारात घुसली कार, एकाचा मृत्यू, चार जखमी

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.