पुण्यातील प्रवाशांना दिलासा, ‘पीएमपीएल’च्या बसेसची संख्या वाढली

Pune Transport | लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे पीएमपीची वाहतूक सध्या मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू आहे. सध्या दररोज सुमारे 4,25,000 हून अधिक प्रवासी पीएमपीतून प्रवास करीत आहेत.

पुण्यातील प्रवाशांना दिलासा, 'पीएमपीएल'च्या बसेसची संख्या वाढली
पुण्यातील प्रवाशांना दिलासा
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 8:25 AM

पुणे: गेल्या काही दिवसांत प्रवासी संख्येत वाढ झाल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) बसेसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून सुमारे 1100 बस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धावतील. लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे पीएमपीची वाहतूक सध्या मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू आहे. सध्या दररोज सुमारे 4,25,000 हून अधिक प्रवासी पीएमपीतून प्रवास करीत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलला दररोज 70 ते 75 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आज नवे कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. या नियमावलीमध्ये पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आलाय. तिसऱ्या लेव्हलमधील नियमांनुसार येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील.

पुण्यातील व्यापारी समाज आक्रमक

राज्य सरकारने सोमवारी ब्रेक द चेन अंतर्गत नवे नियम जारी केले. या नव्या नियमांनुसार सरकारने पुण्याचा समावेश लेव्हल तीनमध्ये केला असून येथे तिसऱ्या लेव्हलचे सर्व नियम लागू असतील. या नियमानुसार येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. याच कारणामुळे येथील व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारने निर्णय बदलावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा येथील व्यापाऱ्यांनी दिला आहे. याच मागणीला घेऊन व्यापाऱ्यांतर्फे पुण्यात 3 ऑगस्ट रोजी पुण्यात घंटानाद आंदोलन केले जाणार आहे.

पुण्यातील व्यापाऱ्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकारने नियमांत बदल केला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. उद्या ( 3 ऑगस्ट) सरकारविरोधात सर्व व्यापारी घंटानाद आंदोलन करणार आहेत. तसेच आमच्यावर खटले भरले तरी चालतील पण बुधवारपासून आम्ही दुकानं खुली करणार आहोत. असा इशारा व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

पुण्यातील कोरोना हॉटस्पॉट गावांची संख्या वाढली, कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार

संबंधित बातम्या:

राज्याची चिंता वाढवणारी बातमी, पुण्यातील ‘या’ गावात डेल्टा प्लसचे 2 रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट

पुण्यात तिसऱ्या लेव्हलचे कोरोना नियम, व्यापारी आक्रमक, “नियम बदला अन्यथा रस्त्यावर उतरणार”

तुळशीबाग मार्केटमध्ये पुणेकरांची तुफान गर्दी, कोरोना नियमांना हरताळ

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.