मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा का रद्द झाला?; मंत्री उदय सामंत यांनी कारण सांगितलं
Uday Samant on CM Eknath Shinde Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात येत आहे. त्या टीकेला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा रद्द का झाला? यावरही उदय सामंत यांन उत्तर दिलं आहे.
पुणे | 30 सप्टेंबर 2023, अभिजीत पोते : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्यांचा हा जर्मनी आणि ब्रिटन दौरा रद्द झाला. यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली. त्याला आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. सध्या आपलं महाराष्ट्र राज्य परदेशी गुंतवणुकीत एक नंबरवर आहे. अनेक कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे यशस्वी झालं आहे. दौरा कुणाच्या ट्विट मूळ नाही तर नागपुरात जी ढगफुटी झाली. राज्यात विविध आंदोलनं सुरू आहेत. म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दौरा रद्द केला, असं उदय सामंत म्हणाले.
आज सकाळी अदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यात दावोसमध्ये झालेल्या करार आणि गुंतवणुकीबद्दल त्यांनी प्रश्न विचारले. सुधीर मुनगंटीवार आणि मी वाघनखं संदर्भातील बैठकात होतो, असं सामंत म्हणाले. दावोस ३२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. ४ दिवसांची परिषद होती. राज्याच्या पॅवेलियनसाठी जास्त भाडं लागलं. आपलं ४ हजार स्केवर फूटचं पॅवेलियन होतं. त्याचा खर्च १६ कोटी रूपये आला. २०२३ च शिष्टमंडळ देखील चौपट होतं. खर्च कुणाच्या सांगण्यावरून ट्विट वरुन झाला नाही. तर तो कामाचा झाला. तो खर्च कमीत कमी करण्याचा आमचा प्रयत्न होता, असं स्पष्टीकरणही उदय सामंत यांनी दिलं.
दावोसमध्ये झालेले करारही उदय सामंत यांनी माध्यमांसमोर मांडले. १ कोटी ३७ लाखाचे करार २०२१ मध्ये झाले. ८० हजार कोटी २०२२ मध्ये झाले. त्यात केवळ १२ हजार कोटींची अंमलबजावणी झाली. १९ करार २०२३ ला झाले. १ लाख ३७ कोटी रूपयांच्या वर करार झाले आहेत. त्यातली ७० टक्के काम पुर्ण झाली आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
सुधीर मुनगंटीवार यांच्या दौराव्यर टीका करु नका, असं आवाहन उदय सामंत यांनी विरोधकांना केलं. ते सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांसाठी करत आहेत. ३ तारखेला लंडनमध्ये जात आहेत. मी पण लंडनला जात आहे. मी स्वतः दावोसला जाऊन आढावा घेणार आहे. ज्यांनी टीका केली आहे की, मी तिकडे कुणाला भेटणार आहे. त्यांनी माझ्यासोबत यावं आणि पाहावं, असंही उदय सामंत म्हणालेत.