उजनीतील आजच्या दिवसाचं शोधकार्य थांबवलं; 6 जण अद्यापही बेपत्ता…
Pune Ujani Dam Boat Accident 6 people are still missing : माढा तालुक्यातील उजनी धरणात काल संध्याकाळी अपघात झाला. या अपघातातील सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. या बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचं काम आजच्या दिवसापुरतं थांबण्यात आलं आहे. का? वाचा सविस्तर...
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरणात काल बोट बुडाल्याची घटना घडली आहे. उजनीतील आजच्या दिवसाचं शोधकार्य थांबवलं गेलं आहे. धरण पात्रात वादळी वारे आणि ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. तसेच अंधार पडल्यामुळे NDRF च्या पथकाने आजच्या दिवसाचं शोधकार्य थांबवलं. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा सुरु शोधकार्य होणार आहे. 24 तासापासून सुरूय बचावकार्य मात्र अद्याप एकाही व्यक्तीचा शोध लागलेला नाही. काल संध्याकाळी 6 च्या सुमारास उलटली बोट होती. या दुर्घटनेतील 7 पैकी 6 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध उद्या पुन्हा घेतला जाणार आहे.
उजनी धरणात शोधकार्य
उजनी धरणात बोट बुडाल्याने या बोटीतील 6 जणांचा शोध अद्याप घेतला जात आहे. घटनास्थळी जात माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पाहणी केली. करमाळा आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर ही दुर्घटना घडली आहे. पाणबुडीला पाण्यात मोटारसायकल सापडल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोटारसायकल पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. MH 45 AJ 2236 स्पेलडर कंपनीची मोटारसायकल बाहेर काढली आहे. तर या बोटीतून प्रवास करणाऱ्या सहाजणांचा शोध अद्याप सुरु आहे. बुडालेली बोट बाहेर ओढून काढण्यात येत होती. मात्र ही बोट गाळात अडकल्याने बोट बाहेर काढण्याची प्रक्रिया सध्या थांबवली.
नेमकं काय घडलं?
उजनी धरणातील बोट दुर्घटना घडल्यानंतर प्रत्यक्षदर्शिने सांगितली आपबीती सांगितली. चंद्रकांत लोखंडे यांनी बोट दुर्घटनेतील एका व्यक्तीला बाहेर काढलं. पोलीस उप निरीक्षक राहुल डोंगरे हे एकमेव व्यक्ती या घटनेत बचावले आहेत.
काल सायंकाळी वादळी वारे आल्यामुळे मी माझी बोट धरणातून बाहेर ठेवण्यासाठी आलो होतो. मात्र वादळी वारे असल्याने समोरचे काहीही दिसत नव्हतं. वादळी वारे शांत झाल्यावर मी धरणात वाड्याकडे पाहिल्यावर मला एक व्यक्ती कडेला दिसला त्यावेळी त्याला आम्ही बाहेर काढलं, असं त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर बोट बुडाल्याची माहिती मिळाली नंतर आम्ही सर्व प्रशासनाला माहिती दिली, असं प्रत्यक्षदर्शी चंद्रकांत लोखंडे यांनी सांगितलं.